Mumbai-Nashik MEMU Shuttle Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Nashik MEMU Shuttle: मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! वंदे भारतसारखी मेमो शटल सेवा लवकर होणार सुरु

Mumbai-Nashik MEMU Local News: मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच मुंबई ते नाशिकसाठी मेमू लोकल शटल सेवा सुरु केली जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

मुंबई आणि नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई ते नाशिक प्रवास सुसाट होणार आहे. लवकरच मुंबई ते नाशिकदरम्यान मेमू शटल सेवा सुरु होणार आहे. यामुळे मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवेसाठी प्रयत्न सुरु होते. त्यांना आता यश येताना दिसत आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने यासाठी पाऊस उचलले आहे. कसारा घाटात मेमू लोकलची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. हा घाट आव्हानात्मक आहे. त्यामुळे या मार्गावर टेस्ट घेतली जात आहे.या सेवेमुळे मुंबई नाशिककरांना खूप फायदा होणार आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर प्रवाशांना मेल किंवा एक्सप्रेसवर अवलंबून राहावे लागणार नाही.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई ते नाशिकदरम्यान लोकल सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तांत्रिक कारणामुळे हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही. आता प्रशासनाने शटल सेवा सुरु करण्यासाठी चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. दिव-वसई मार्गाप्रमाणे मुंबई नाशिक मार्गावर शटल सेवा सुरु करण्यासाठी पडताळणी सुरु आहे.या चाचणीत कसारा घाटातील चढ-उतार मार्गावर मेमू लोकलची क्षमता तपासली केली जाणार आहे.

मेमू लोकलची चाचणी कशी होणार? (Memu Local)

मेमू लोकलची चाचणी करताना कसारा घाटातील चढणीवर किती वीजपुरवठा लागतो ते चेक केले जाते.

ही लोकल किती प्रवाशांनी भरुन चढणीवर धावू शकते याबाबत पडताळणी केली जाणार आहे.

घाटातील बोगद्यातून किंवा उतार मार्गावरुन काही अडचणी येतात का त्याची तपासणी केली जाणार आहे

मेमू लोकलची खासियत (Mumbai Nashik Memu Local Features)

मेमू लोकल ही वंदे भारत प्रमाणेच असणार आहे. या मेमू लोकलमध्ये १९ डबे प्रस्तावित आहेत. या लोकला वेग देण्यासाठी ६ मोटर कोच असणार आहे. त्यामुळे ही लोकल जास्त वेगाने धावण्याची शक्यता आहे.ही सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. या चाचण्या लवकर होऊन ही सेवा प्रवाशांसाठी लवकर सुरु करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Anagha Atul: आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार...

Ganpati Decoration Video: फुलांच्या माळा अन् रंगीबेरंगी पडदे; अवघ्या अर्धा तासात सजेल गणरायाचं मखर Video

Lenyadri Caves History: वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा, जुन्नरमधील लेण्याद्री लेण्यांचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

Lonavala Crime : मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव; लोणावळ्यात दोन ठिकाणी चोऱ्या, सहा लाखाचा ऐवज लांबविला

SCROLL FOR NEXT