Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Shegaon Vande Bharat Express : विदर्भाची पंढरी म्हणवल्या जाणाऱ्या शेगावमधून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे शेगावला भेट देणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
Vande Bharat Express
Vande Bharat Express saam tv
Published On
Summary
  • पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारत एक्सप्रेसला शेगावमध्ये थांबा मिळाला.

  • गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीचा होणार.

  • ट्रेन ८८१ किमी अंतर ७३ किमी प्रतितास वेगाने पार करणार.

Shegaon Vande Bharat Express Update : विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. शेगाव हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज या ठिकाणी वास्तव्याला होते. शेगावमध्ये गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. महाराष्ट्रातून अनेकजण शेगावला भेट देत असतात. विदर्भाव्यतिरिक्त पुण्याहून अनेक भाविक येथे भेट देत असतात. या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेगावला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. पुणे-अजनी (नागपूर), बंगळुरू-बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर या ३ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. यातील पुणे-अजनी (नागपूर) या वंदे भारत एक्सप्रेसला शेगावमध्ये थांबा मिळाला आहे. शेगावमधून वंदे भारत एक्सप्रेस जाणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर-सुकर होणार आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat Express : नगरला मिळाली वंदे भारत एक्सप्रेस, पुणे-नागपूरचा प्रवास झाला वेगवान; वाचा सविस्तर

या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या मार्गावर अजनी, नागपुर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगांव, मनमाड, कोपरगांव, अहिल्यानगर, दौंड मार्गे पुणे या ठिकाणी ट्रेन थांबणार होती. विदर्भाची पंढरी अशी ओळख असललेल्या शेगाव येथे महाराष्ट्रासह देशभरातून भाविक येत असतात. तेव्हा या वंदे भारत एक्सप्रेस मार्गिकेमध्ये शेगावलाही थांबा मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर शेगावला एक्सप्रेस ट्रेन थांबणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

Vande Bharat Express
Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारत एक्सप्रेस वर्धा ते मनमाड यांना पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा मिळणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे. ही ट्रेन ८८१ किमी अंतर पार करेल. सरासरी वेग ७३ किमी प्रतितास असलेल्या या ट्रेनला प्रवासादरम्यान १० स्थानकांवर थांबा असेल.

Vande Bharat Express
Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी भडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com