Mumbai Nagpur Corridor Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Nagpur Corridor : समृद्धी महामार्ग कोस्टल रोडशी जोडणार; मुंबई-नागपूर फक्त ८ तासात, वाचा सरकारचा नेमका प्लान काय?

Mumbai Nagpur Corridor 8 Lane Connecting Road: नागपूर ते मुंबई प्रवास आणखी जलद होणार आहे. समृद्धी महामार्गावरुन थेट कोस्टल रोडशी जोडणारा नवीन मार्ग बांधण्यात येणार आहे.

Siddhi Hande

मुंबई-नागपूर प्रवास सुसाट होणार

समृद्धी महामार्ग कोस्टल रोडशी जोडणार

८ पदरी नवीन मार्ग बांधणार

मुंबई ते नागपूर हा प्रवास समृद्धी महामार्गामुळे वेगवान झाला आहे. परंतु आता हा प्रवास आणखी जलद आणि सुखकर होणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरुन थेट दक्षिण मुंबईत जाता येणार आहे. समृद्धी महामार्गावरुन दक्षिण मुंबईत जाण्यासाठी खूप वाहतूक कोंडी होते. आमणे ते दक्षिण मुंबईत जाण्यासाठी दोन तास लागतात. आता प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे.

समृद्धी महामार्गावरुन थेट दक्षिण मुंबई गाठता येणार

आता समृद्धी महामार्गावरुन थेट दक्षिण मुंबईसाठी नवीन ८ पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १८ किमी लांबीचा हा रस्ता बांधणार आहे.हा मार्ग कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे. या रोडमुळे नागपूर ते दक्षिण मुंबई हा प्रवास खूप कमी कालावधीत होणार आहे.

समृद्धी महामार्ग कोस्टल रोडशी जोडण्यासाठी नवीन मार्ग बांधण्यात येणार आहे. यादृष्टीने चाचपणी सुरु झाली आहे. मुंबई-वडोदरा महामार्ग, ठाणे सागरी किनारा मार्ग आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. पुढे भविष्यात हा मार्ग सागरी सेतूद्वारे मुंबईत पोहचता येणार आहे.

नागपूरहून मुंबई फक्त ८ तासात

महाराष्ट्र राज्य रस्ते विकाम महामडंळाच्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते आमणे प्रवास फक्त ७ तासात करता येतो. यापुढे वरळी, वांद्रे, दहीसर या ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.यासाठी जवळपास २ तास लागतो. यामुळेच हा नवीन १८ किमी लांबीचा मार्ग बांधणार आहे. यामुळे हा २ तासांचा वेळ वाचणार आहे.

हा रस्ता नेमका कधी आणि कुठून सुरु होईल, याबाबत कोणीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी २००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

SCROLL FOR NEXT