Mumbai news  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईतील 79 नगरसेवकांचं पद अडचणीत; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही बडे चेहरे अचडणीत

Mumbai news : जनतेच्या न्यायालयात जिंकले... पण आता कोर्टाच्या फेऱ्यात अडकले! दिग्गजांचं टेन्शन चांगलंच वाढलंय. जर कोर्टाचे निकाल उलटे लागले, तर मुंबई पालिकेचं सत्तेचं संपूर्ण गणितच कोलमडून पडू शकतं. मुंबईच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा कायदेशीर पेच नेमका काय आहे? पाहा हा खळबळजनक विशेष रिपोर्ट...

Snehil Shivaji

मुंबई महापालिकेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता उलथवून भाजपनं पहिल्यांदाच पालिकेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या. परंतु, या निवडणुकांचा धुराळा शांत होतो न होतो, तोच आता महापालिकेत नगरसेवकांच्या विरोधात याचिकांचं वादळ उठलंय. निकालानंतर मुंबई पालिकेच्या विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची अधिकृत माहिती समोर आलीये; आणि ही माहिती मुंबईतील अनेक नगरसेवकांची झोप उडवणारी आहे.

निवडणुकीतील पराभूत उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या विजयी नगरसेवकांचं टेन्शन चांगलंच वाढवलंय. या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल करण्यामागची कारणं काय आहेत ते पाहूयात...

कशामुळे 79 नगरसेवकांचं पद धोक्यात?

निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार

मतमोजणीवरील गंभीर आक्षेप

फेरमतमोजणीची थेट मागणी

उमेदवारी अर्जांबाबत कायदेशीर वाद

निवडणूक नियमांचं उघडपणे उल्लंघन

अशा विविध आरोपांमुळे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पदाला थेट ग्रहण लागलंय. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधल्या बड्या चेहऱ्यांचा यात समावेश आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश आहे.

मुंबईच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने निवडणूक याचिका दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होतंय. आतापर्यंत केवळ एकाच याचिकेचा निकाल लागलाय. त्यामुळे उर्वरित याचिकांचा निकाल लवकरात लवकर लावण्याची मागणी होतेय.

निवडणुकीनंतर एकाच वेळी ७९ नगरसेवकांच्या वैधतेवर आक्षेप घेण्याची ही आजवरची सर्वात मोठी आणि दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचं सत्तेचं गणित आणि दिग्गजांचं राजकीय भवितव्य आता पूर्णपणे कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. आणि याच निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exhaust Fan Cleaning Tips : एक्झॉस्ट फॅन घरच्या घरी कसा कसा स्वच्छ कराल? लगेचच वाचा टिप्स

कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत जाणार; पंतप्रधान मोदींचा मोठ्या संकटाचा इशारा

CSK ला पराभूत करत SRH नं मिळवलं प्लेऑफचं तिकीट; गुजरात टायटन्सचीही चांदी

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

SCROLL FOR NEXT