Sakshi Sunil Jadhav
शहरांमध्ये तुम्हाला ब्लू टिट (Blue Tit) पक्षी दिसत असतील. हे पक्षी घरटे बांधताना वापरलेल्या सिगारेटच्या फिल्टरचा वापर करत असल्याचं आढळलं आहे.
सिगारेटच्या थोटकांमध्ये असलेले निकोटिन आणि इतर रसायनांमुळे टिक, माइट, पिसू यांसारख्या परजीवी कीटकांना लांब ठेवता येतं.
नैसर्गिक जंगलांमध्ये हे पक्षी सुगंधी आणि औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची पाने व फांद्या घरट्यात आणतात.
शहरांमध्ये अशा वनस्पती सहज उपलब्ध नसतात. म्हणून पक्ष्यांनी पर्याय म्हणून सिगारेटचे थोटूक वापरायला सुरुवात केली आहे.
संशोधकांनी काही नैसर्गिक घरट्यांमध्ये सिगारेटचे फिल्टर ठेवले, तर काही ठिकाणी कृत्रिम घरटी तयार करून त्यांचा अभ्यास केला.
सिगारेटचे थोटूक असलेल्या घरट्यांमधल्या पिल्लांमध्ये हिमोग्लोबिन आणि इतर आरोग्यदायी घटकांचे प्रमाण तुलनेने चांगले आढळलं.
सिगारेटचे थोटूक असलेल्या घरट्यांमध्ये टिक, माइट आणि पिसू यांची संख्या नैसर्गिक घरट्यांच्या तुलनेत कमी होती.
सिगारेटच्या फिल्टरमध्ये हजारो विषारी रसायनं आणि जड धातू असतात. त्यामुळे जास्तकाळ संपर्कात राहिल्यास पक्ष्यांच्या पेशी आणि डीएनएवर वाईट परिणाम होऊ शकतो.