Daryabhawani: 'दर्याभवानी'चा फर्स्ट लूक आऊट! गड-किल्ले सर केल्यानंतर आता लाटांवर राज्य; 'या' दिवशी चित्रपटगृहात धडकणार

Daryabhawani: दिग्पाल लांजेकर यांच्या 'श्री शिवराज अष्टक' मालिकेतील सातवा चित्रपट 'दर्याभवानी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी इतिहासावर आधारित चित्रपट १५ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार.
Daryabhawani
DaryabhawaniSaam Tv
Published On

Daryabhawani: लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' चित्रपट मालिकेतील सातवा आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट 'दर्याभवानी' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने सोशल मीडियावर मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, या पोस्टर अनावरण सोहळ्याला दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांची उपस्थिती लाभली, त्यामुळे या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

पोस्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याची भव्य झलक पाहायला मिळते. 'ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र' या शिवरायांच्या दूरदर्शी विचारांवर आधारित हा चित्रपट हिंदवी स्वराज्याच्या आरमारी शक्तीचा इतिहास मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. स्वराज्याची सागरी सुरक्षा, जलदुर्गांची उभारणी, आरमाराची निर्मिती आणि समुद्रावरील मराठी वर्चस्व यांची थरारक कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे.

Daryabhawani
Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, "शिवरायांचा इतिहास हा केवळ गड-किल्ल्यांचा नसून समुद्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वराज्याचाही आहे. 'दर्याभवानी'च्या माध्यमातून त्यांच्या सागरी दूरदृष्टीचा, आरमार उभारणीच्या अभूतपूर्व कार्याचा आणि जलदुर्गांच्या सामर्थ्याचा इतिहास प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे."

Daryabhawani
Harshad Chopda: 'गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मला चीट...'; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

या चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ आणि सचिन देशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. श्री तिरुपती बालाजी चित्र आणि एलेवेट फिल्म्स यांच्या निर्मितीतील हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १५ जानेवारी २०२७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com