मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार? निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपाने खळबळ

bmc news : मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद अडचणीत आलं आहे. या नगरसेवकांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
bmc news update
bmc news Saam tv
Published On
Summary

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026

तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

अनेक निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई महानगरपालिका निवडणूक धुरळा शांत झाला आहे. परंतु या निवडणुकीनंतर न्यायालयीन लढाईनं जोरदार धरल्याचे समोर येत आहे. मुंबईत तब्बल ७९ नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. यामुळे मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आ

निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार, मतमोजणीतील गोंधळ आणि उमेदवारी अर्जातील त्रुटींवरून या निवडीला आव्हान देण्यात आल्याचं समजतंय. मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागातील नगरसेवकांचा यात समावेश आहे. त्यामुळे या नगरसेवकांचं भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.

bmc news update
State debt in India: भारतातील सर्वात कर्जबाजारी राज्य कोणतं? नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्यात. त्यातील अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात लघुतम न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. तर उर्वरित प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

mumbai news
bmc Saam tv
bmc news update
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे ६ खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

सदर माहिती अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलीये. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिका निवडणुकीत आव्हान देण्यात आलेल्या निवडणूक याचिकांची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेकडे मागविली होती. तर प्रभाग 119 ‘एस’ मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेना नगरसेवक राजेश सोनावळे यांच्यासह अन्य उमेदवारांविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने रद्दबातल केली आहे.

मुंबईतील 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिकांमुळे राजकीय पक्षांचंही टेन्शन वाढलं आहे. यावर अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या याचिकांवर राजकीय नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com