Mumbai Metro Line 3  x
मुंबई/पुणे

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट, अंडरग्राऊंड मेट्रो ३ लवकरच सेवेत; स्थानके किती अन् कसा कराल प्रवास?

Good News For Mumbaikar: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अंडरग्राऊंड मेट्रो ३ लवकरच सुरू होणार आहे. या मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावक किती आणि कोणती स्थानके असणार आहे हे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • मेट्रो ३ हा अंडरग्राऊंड प्रोजेक्ट लवकरच सुरू होणार आहे.

  • सिप्झ ते कफ परेडपर्यंत उत्तर-दक्षिण मुंबई जोडली जाणार आहे.

  • मेट्रो १ आणि २ सोबत जोडणीमुळे प्रवास सोपा होणार आहे.

  • ट्रॅफिकमुक्त, गारेगार आणि जलद प्रवासाची सुविधा मुंबईकरांना मिळणार आहे.

बहुचर्चित मेट्रो- ३ बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ही मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झाल्यानंतर उत्तर मध्य मुंबईवरून दक्षिण मुंबईला जाण्याचा प्रवास सुसाट होऊन जाईल. या मेट्रोमुळे दक्षिण मुंबईत राहणाऱ्यांचा प्रवास सुलभ होईल आणि त्यांची ट्राफिकमधून सुटका होईल. ही मेट्रो कधीपासून सुरू होणार याची सर्व मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत.

मेट्रो-३ वर किती स्थानके?

सुरुवातीला सिप्झ-बीकेसी-कुलाबा म्हणून ओळखली जाणारी मेट्रो सध्या जेव्हीएलआर-सिप्झ आरे कॉलनी-विमानतळ-बीकेसी-दादर-सिद्धिविनायक मंदिर-वरळी मार्गे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून धावते. आता, अंतिम टप्प्यातील काम वेगाने सुरू आहे. लवकरच ही मेट्रो नेहरू विज्ञान केंद्र-महालक्ष्मी-काळबादेवी-सीएसएमटी-चर्चगेट-मंत्रालय-कफ परेडच्या बाजूने धावणार आहे. हा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या मेट्रोमुळे उत्तर-मध्य मुंबईतील आरे आणि सिप्झला दक्षिण मुंबईतील कफ परेडशी जोडले जाईल. यामुळे अनेक मार्गांवरील प्रवास सुसाट आणि अधिक सोयीस्कर होईल.

मेट्रो-१, २ आणि ३ वरून कसा करायचा प्रवास?

मेट्रो ३ मार्गावर मरोळ नाका हे स्टेशन असणार आहे. हे स्टेशन घाटकोपर-वर्सोवा- घाटकोपर मेट्रो लाईन १वरील याच नावाच्या स्टेशनशी सोडलेले आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व, मरोळ आणि वर्सोवा येथील रहिवासी दक्षिण मुंबईला जाण्यासाठी मेट्रो १ आणि मेट्रो ३ मधून देखील जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, अंधेरी पश्चिम, मेट्रो २अ आणि गुंदवली, मेट्रो ७ देखील मेट्रो १ शी जोडलेली आहेत. दहिसर, एकसार, मालाड, कांदिवली, ओशिवरा, दिंडोशी, गोरेगाव आणि जोगेश्वरी येथील नागरिक मेट्रो २अ किंवा मेट्रो ७ वापरून, मरोळ नाका स्टेशनमार्गे मेट्रो -३ ने प्रवास करत कमी वेळात दक्षिण मुंबईला पोहोचू शकतात. ज्यामुळे त्यांचा प्रवास आरामदायी आणि गारेगार होईल.

कात्रिच्या आकाराचे ट्रॅक -

परेड हे मेट्रो ३ वरील सर्वात दक्षिणेकडील स्टेशन आहे. या ठिकाणी ट्रॅक एकमेकांना जोडल्यामुळे ते कात्रीसारख्या आकाराचे आहे. १८ ते २० मीटर जमिनीखाली स्थित ही रचना नेत्रदीपक दिसते. मेट्रो ३ बांधणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रसिद्ध केलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेट्रो प्रवास प्रवाशांसाठी खूपच खास आणि उत्सुकतेचा असणार आहे.

ट्राफिकमधून होणार सुटका -

सीएसएमटी रेल्वे स्टेशन हे मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे केंद्र आहे. दररोज लाखो प्रवासी या रेल्वे स्थानकावर उतरतात आणि विविध वाहतुकीच्या साधनांचा वापर करून दक्षिण मुंबईतील त्यांच्या कामाच्या ठिकाणी जातात. मेट्रो ३ त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. सीएसएमटी येथे उतरल्याने हे प्रवासी ट्राफिकमध्ये अडकून बस किंवा टॅक्सीने प्रवास करण्याऐवजी ते मेट्रोच्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचू शकतील. हे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन उपनगरीय रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Flood: सोलापूरात आभाळ फाटलं! ७२९ गावांना पुराचा फटका, २ लाख हेक्टर शेतीचं नुकसान; ६ जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

Latur Rain : उभं पीक पाण्याखाली गेलं, शेतकरी महिलेचा टाहो बघून डोळ्यांत पाणी येईल|पाहा VIDEO

Dadar Hidden Gems: जोडीदारासोबत दादरमध्ये फिरताय? मग हे Hidden स्पॉट्स करा नक्की Explore

Ahilyangar Flood : लेकासाठी बाप निसर्गाशी लढला; पुरातूनही वाट काढत दवाखाना गाठला

SCROLL FOR NEXT