Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो ३ चा अंतिम टप्पा लवकरच खुला होणार

Mumbai News : मुंबई मेट्रो ३ मार्गिकेचा वरळी नाका ते कफ परेड अंतिम टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरे ते कफ परेड मार्ग प्रवासी सेवेत दाखल होणार असून, प्रवासाचा वेळ केवळ ६० मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो ३ चा अंतिम टप्पा लवकरच खुला होणार
Mumbai Metro 3 Saam tv
Published On
Summary
  • मेट्रो ३ अंतिम टप्प्याची सीएमआरएस तपासणी लवकरच होणार

  • आरे ते कफ परेड संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार

  • प्रवासाचा वेळ फक्त ६० मिनिटांपर्यंत कमी होणार

  • लोकलवरील ताण कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील नागरिक वाट पाहत असलेल्या मेट्रो ३ (आरे ते कफ परेड) मार्गिकेचा अंतिम टप्पा आता प्रवासी सेवेसाठी खुला होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे या मार्गिकेच्या सायन्स म्युझियम ते कफ परेड या भागाच्या तपासणीसाठी ‘कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी’ (सीएमआरएस) यांना पत्र पाठविण्यात आले आहे. सीएमआरएस पथकाकडून लवकरच या मार्गाची सखोल तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यास हा टप्पा प्रवाशांसाठी खुला केला जाईल.

या मार्गाच्या सुरूवातीने मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडणार आहे. आरे वसाहत ते कफ परेड हा ३३.५ किलोमीटर लांबीचा पूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला झाल्यास, पूर्व आणि पश्चिम उपनगरांपासून दक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानके असून, तो संपूर्णपणे भुयारी आहे.

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो ३ चा अंतिम टप्पा लवकरच खुला होणार
Mumbai Metro : लोकलचा भार हलका होणार, एकाच महिन्यात ४ मेट्रो मार्ग सुरू होणार, वाचा कोणकोणत्या भागाला होणार फायदा?

आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये मेट्रो ३ ची सेवा सुरू करण्यात आली आहे. पहिला टप्पा म्हणजे आरे ते बीकेसी या १२.६९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ७ ऑक्टोबर २०२४ पासून सेवा सुरू झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या ९.७७ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे ९ मे २०२५ रोजी लोकार्पण झाले. या दोन्ही टप्प्यांमुळे आरे ते आचार्य अत्रे चौकदरम्यान १६ स्थानकांवर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली.

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो ३ चा अंतिम टप्पा लवकरच खुला होणार
Mumbai Metro : ठाण्याहून थेट गेट वे ऑफ इंडिया, Metro 11 प्रस्तावाला मंजुरी; किती आणि कोणती स्थानके? वाचा सविस्तर

आता शेवटच्या टप्प्यात वरळी नाका ते कफ परेड या ११.२ किलोमीटरच्या मार्गावरील ११ स्थानकांवर सेवा सुरू होणार आहे. यात महत्त्वाची स्थानके म्हणजे वरळी नाका, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, चर्चगेट, विधानभवन, काळबादेवी, सीएसएमटी आणि कफ परेड यांचा समावेश आहे. या मार्गामुळे विशेषतः दक्षिण मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो ३ चा अंतिम टप्पा लवकरच खुला होणार
Mumbai Metro Update : ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार, २ महिन्यात मेट्रो ४ सुसाट धावणार

एमएमआरसीने या टप्प्यासाठी आवश्यक असलेली अग्निसुरक्षा प्रमाणपत्रे, विविध शासकीय यंत्रणांकडून एनओसी आणि अन्य परवानग्या मिळवल्या आहेत. फक्त सीएमआरएसची तपासणी व मान्यता शिल्लक आहे. ती मिळताच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल. या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पूर्ण मेट्रो ३ मार्ग प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो ३ चा अंतिम टप्पा लवकरच खुला होणार
Mumbai Metro: मुंबईकरांना मिळणार नवी मेट्रो; मीरा भाईंदरकरांचा प्रवास होणार सुसाट, नेमके किती थांबा अन् तिकीटांचे दर किती?

या मार्गिकेमुळे कफ परेडपासून आरेपर्यंत प्रवास करणे सहज शक्य होईल. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ केवळ ६० मिनिटांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मेट्रो ३ मार्गिका महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, पर्यावरणपूरक प्रवासासाठी हा मार्ग एक मोठा पर्याय ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com