Metro 3 Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro 3: आरे ते वरळी प्रवास होणार सुसाट! मेट्रो ३चा दुसरा टप्पा मार्च महिन्यात खुला होणार, तिकीट आणि स्थानके किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai Metro 3 Route: मेट्रोचे जाळे पूर्ण मुंबईत पसरत आहे. मुंबई मेट्रो ३ मार्गातील दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. यामुळे आरे ते वरळी हा प्रवास करता येणार आहे.

Siddhi Hande

मुंबईत सगळीकडे मेट्रोचे जाळे पसरत आहे. आता मेट्रो ३ मधील अजून एक मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुंबईत वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणे सोयीस्कर असणार आहे. यामुळे मुंबईकरांना फायदा होणार आहे. मेट्रो ३ मधील हा दुसरा टप्पा वरळी (आचार्य अत्रे चौक) ते बीकेसी असा असणार आहे. आता तुम्हाला आरे ते वरळी हा प्रवास ३६ मिनिटांत करता येणार आहे. (Metro 3 Route)

गेल्या वर्षी आरे ते बीकेसी हा मार्ग ऑक्टोबर महिन्यात खुला झाला होता. त्यानंतर आता पुढच्या महिन्यात वरळी ते बीकेसी हा मार्ग खूला होणार आहे. त्यामुळे आरे ते वरळी हा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.

दरम्यान या मेट्रोचे भाडे १० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत असणार आहे. हे भाजे प्रत्येक स्थानकानुसार वेगळे असणार आहे.या मेट्रो मार्गात लेडी जमशेदजी रोड, डॉ. अॅनी बेझंट रोड या ठिकाणी जाता येईल. हा मेट्रो मार्ग धारावी, दादर, सिद्धिविनायक, वरळी यांसारख्या भागांना जोडणार आहे. यामुळे प्रवास जलद आणि सोपा होईल.

या नवीन मार्गामुळे वाहतुक कोंडीपासून सुटका होणार आहे. दादरमधील मेट्रो स्टेशन मुख्य रेल्वे स्थानकापासून ते एक किलोमीटर अंतरावर आहे. याचसोबत बीकेसी आणि वरळी या ठिकाणी जाण्याचा मार्ग जलद होणार आहे.

बीकेसी आणि धारावी दरम्यानच्या १.८ किमी लांबीच्या मार्गासाठी विशेष बोगदा बोरिंग मशीन वापरण्यात आले आहे. (Metro 3 News)

मेट्रो ३ चा मार्ग (Metro 3 Stations)

मेट्रो ३ ही ३३.५ किमी लांबीच्या भूमिगत कॉरिडॉरमधून धावणार आहे. ही मेट्रो आरे डेपो ते कफ परेडशी जोडली जाणार आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानके असणार आहे. यात सीप्झ, बीकेसी, धाराव, दादर, सिद्धिविनायक, वरळी नाका, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी आणि चर्चेगेट हे मुख्य थांबे असतील.या मेट्रो मार्गामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT