Siddhivinayak Darshan: दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात जाताय? आधी ही बातमी वाचाच;५ दिवस मंदिर बंद कारण..

Siddhivinayak Temple Closed for Darshan: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाविकांना ५ दिवस सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार नाही. तसेच श्रीमारूतीचे दर्शनही भाविकांसाठी बंद राहील.
Siddhivinayak temple
Siddhivinayak templeSaam Tv News
Published On

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दिवसभरात भाविकांची रेलचेल सुरू असते. दर्शनासाठी भाविक परदेशातूनही येतात. महाआरतीलाही उपस्थित राहतात. मात्र, भाविकांना ५ दिवस सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार नाही आहे. नेमकं कारण काय? जाणून घ्या.

प्रभादेवी स्थित सिद्धिविनायक मंदिरात बुधवार दि. ११ डिसेंबर ते रविवार १५ डिसेंबर या कालावधीत, मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाही आहे. कारण या कालावधीत श्री सिद्धिविनायकाचे सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद राहणार आहे. परंतू, भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन दिले जाईल. या काळात नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेवर सुरू राहतील.

Siddhivinayak temple
Mumbai Local Train : हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत; पनवेल ते CSMT दरम्यान तांत्रिक बिघाड

पुन्हा दर्शन कधी घेता येणार?

सिद्धिविनायक मंदिरात गाभाऱ्यात जाऊन ५ दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नाही आहे. दर्शन भाविकांसाठी ५ दिवस बंद राहणार असून, या काळात सिंदूर लेपन हा विधी पार पडेल. त्यानंतर सोमवारी दि. १६ डिसेंबरला गाभाऱ्यामध्ये स्थलशुद्धी प्रीत्यर्थ उदकशांत आणि प्रोक्षण विधी हा धार्मिक विधी पार पडेल. त्यानंतर श्रींची महापूजा नेवैद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुला होईल.

Siddhivinayak temple
Siddhivinayak Darshan: भाविकांसाठी खुशखबर! सिद्धिविनायकला जाणं झालं सोपं, दर पाच मिनिटांनी फक्त ५ रुपयांत बससेवा

श्रीमारूतीचे देखील सिंदूर लेपन

तसेच सिद्धिविनायकासोबतच श्रीमारूतीचे देखील सिंदूर लेपन करण्यात येते. यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे हा विधी होणार आहे. त्यामुळे या कालावधीत श्रीमारूतीचे दर्शनही बंद राहील. दरम्यान, १६ डिसेंबरपासून श्री मारूतीवर संक्षिप्त चालन विधी करून पहाटे भाविकांना श्रीमारूतीचे दर्शन घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com