जवाहरलाल नेहरु बंदरांपर्यंत स्वतंत्र मालवाहतूकीसाठी मार्गिका
मुंबई- नवी मुंबई लोकलवरील ताण कमी होणार
मुंबई लोकल वेळेत धावणार
मुंबई लोकलचा प्रवास आता आणखी सुखकर आणि जलद होणार आहे. आता जेएनपीटी म्हणजे जवाहरलाल नेहरु बंदरांपर्यंत मलवाहतूक मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आला आहे. हा टप्पा एप्रिलमध्ये सुरु होणार आहे. यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे वेळेवर येण्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी मेल एक्सप्रेसमुळे लोकल गाड्यांना थांबावे लागत होते. आता या स्वतंत्र मार्गिकेमुळे लोकल सेवांना उशिर होणार नाही.
मालवाहतूकीसाठी समर्पित मार्गिका
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मालवाहतूकीसाठी समर्पित मार्गिका सुरु झाल्याने सध्याच्या लोकल ट्रेनवरील ताण कमी होईल. मेल एक्सप्रेससाठी अतिरिक्त जागा उपब्ध होईल.
जेएनपीटी समर्पिक मालवाहतूक मार्गिका दादर ते थेट नवी मुंबईतील जवाहरलाल बंदराशी जोडली जाते. आतापर्यंत मालगाड्या आणि पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ट्रॅकचा वापर करतात. यामुळे प्रवासी गाड्यांवर त्याचा परिणाम होतो. यामुळे मालवाहतूकीसाठी समर्पिक रेल्वे मार्गिका सुरु केली जाणार आहे. आता हा मार्ग सुरु झाल्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती बदलणार आहे.
मालगाडीमुळे इतर लोकलला थांबावे लागणार नाही
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे ट्रॅकवर रोज ५० ते ५५ मालगाड्या धावतात. एप्रिल महिन्यापासून या सर्व रेल्वे मालगाडीसाठी तयार केलेल्या मार्गिकेवरुन धावतील. त्यामुळे मुख्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकलला जास्त वेळ थांबावे लागणार नाही. सध्या मालगाड्यांमुळे लोकलला अनेकदा एकाच ठिकाणी थांबावे लागते.
रेल्वेच्या म्हणण्यांनुसार, एक मालगाडी म्हणजे दीड मेल एक्सप्रेस तर प्रवासी गाड्यांच्या लांबीची असते. त्यामुळे जर मुख्य ट्रॅकवरुन या मार्गिकांचा प्रवास बंद झाला तर ट्रॅक क्षमता वाढले. यामुळे स्थानिक लोकल वेळेवर सुटतील. याचसोबत भविष्यात जास्त मेल किंवा एक्सप्रेस गाड्यादेखील चालवल्या जाऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.