Mumbai Local Train Update  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : लोकलच्या वाहतुकीत मोठे फेरबदल, तब्बल 175 रेल्वेगाड्या तडकाफडकी रद्द; नेमकं कारण काय?

Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाजवळ सहाव्या मार्गिकेचं काम सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

Satish Daud

लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाजवळ सहाव्या मार्गिकेचं काम सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आज सोमवारी (ता. ३०) ते मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.

याशिवाय नियमित धावणाऱ्या काही लोकलच्या वेगावर देखील मर्यादा आणण्यात आली आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार असून सुमारे 175 लोकल सेवा रद्द होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार 4 ऑक्टोबरपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. सहाव्या मार्गिकेचे काम जसजसे पुढे जाईल तसतसे वेगावरील निर्बंध हटवले जातील आणि रद्द होणाऱ्या गाड्यांची संख्याही कमी होईल.

गोरेगावहून जलद लोकल धावणार नाहीत

पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्टेशन मानल्या जाणाऱ्या गोरेगाव येथून सकाळच्या गर्दीच्या वेळी नियमित 4 जलद लोकल धावतात. मात्र, विशेष ब्लॉकमुळे या चारही लोकल सेवा रद्द राहतील. या कामानंतर मालाड स्थानकाचा सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक 3 बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 करण्यात येणार आहे. पाचव्या मार्गावरील पॉइंट क्रमांक 105 आणि पॉइंट 109 चे काम रेल्वेकडून पूर्ण झाले आहे.

डिसेंबर 2024 पर्यंत बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गाचा विस्तार करण्याची पश्चिम रेल्वेची योजना आहे. सहाव्या मार्गाच्या विस्तारामुळे मेल एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल आणि लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा मार्गही खुला होईल. या विस्तारामुळे चर्चगेट ते बोरिवली दरम्यानच्या लोकल गाड्या नियमित वेळेत धावणार आहेत.

लोकलच्या वाहतुकीत मोठे फेरबदल

  • चर्चगेट-विरार लोकल: चर्चगेटहून 23:27 वाजता निघेल आणि 01:15 वाजता विरारला पोहोचेल.

  • चर्चगेट-अंधेरी लोकल: चर्चगेटहून 01:00 वाजता निघेल आणि 01:35 वाजता अंधेरीला पोहोचेल.

  • विरार-चर्चगेट लोकल: विरारहून 23:30 वाजता निघेल आणि चर्चगेटला 01:10 वाजता पोहोचेल.

  • बोरिवली-चर्चगेट लोकल: बोरिवलीहून 00:10 वाजता निघेल आणि चर्चगेटला 01:15 वाजता पोहोचेल.

  • गोरेगाव-सीएसएमटी लोकल: गोरेगावहून 00:07 वाजता सुटेल आणि 01:02 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

1 ऑक्टोबर 2024 रोजी धावणाऱ्या लोकलचा तपशील

  • विरार-बोरिवली लोकल (स्लो): अतिरिक्त लोकल म्हणून चालवली जाईल, जी विरारहून ०३:२५ वाजता सुटेल आणि बोरिवलीला ४:०० वाजता पोहोचेल.

  • बोरिवली-चर्चगेट लोकल (स्लो): अतिरिक्त लोकल म्हणून चालवली जाईल, जी बोरिवलीहून 04.25 वाजता सुटून चर्चगेटला 05.30 वाजता पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT