संजय महाजन, साम टीव्ही
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अत्यंत कमी कालावधीत रोहिणी खडसे यांनी जळगावच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमाला त्या आवर्जून हजेरी लावतात. हातात माइक घेऊन रोहिणी खडसे नेहमी आपल्या पक्षाची भूमिका मांडत विरोधकांवर टीकेचा भडिमार करतात.
अशातच रोहिणी खडसे यांनी रविवारी (ता २९) जळगाव येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात रोहिणी यांच्या हातात माइक ऐवजी चक्क साप असल्याचं दिसून आलं आहे. त्यांचा हा नवा अवतार चर्चेचा विषय ठरला असून हातात साप पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण रोहिणी यांच्या धाडसाचं कौतुक करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवचरण उज्जेंकर फाऊंडेशनकडून मुक्ताईनगर येथे रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यासोबतच सर्वसामान्य जनतेला सापांची ओळख व्हावी तसेच विषारी, बिन विषारी साप कसे ओळखावे, याबाबत जनजागृती करण्यात आली.
त्याचबरोबर साप चावल्यास काय खबरदारी घ्यावी याची माहिती देखील कार्यक्रमात देण्यात आले. या कार्यक्रमात रोहिणी खडसे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी रोहिणी यांनी व्यासपीठावर आल्यानंतर भलामोठा साप हातात पकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या धाडसाचं अनेकजण कौतुक करत आहेत.
रोहिणी खडसे यांनी हातात साप पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. साप असं नाव जरी ऐकलं तरी आपली भांबेरी उडते. साप दिसला की अनेकजण दूर पळण्याचा प्रयत्न करतात. अशातच रोहिणी खडसेंनी साप हाती घेतल्याने जळगावात शहरात त्यांच्या धाडसाची जोरदार चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.