Mumbai Local Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांच्या अंत्यविधीला जाताना काळाने गाठलं

Mumbai Local Accident: मध्य रेल्वे मार्गावर लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला. कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. ३६ वर्षीय तरुण नातेवाईच्या अंत्यविधीसाठी जात असताना ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • मुंबई लोकलमधून पडून ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • कोपर-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली घटना

  • गर्दीमुळे तोल जाऊन तो लोकलमधून खाली पडला

  • रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे

मयूर राणे, मुंबई

मुंबईमध्ये धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेला ३६ वर्षीय तरुण कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडला. या रेल्वे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस उदय पवार (वय ३६ वर्षे) असे लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तेजस दिव्यामध्ये कुटुंबीयांसोबत राहत होता. तेसज गुरुवारी रात्री साधारण साडेआठच्या दरम्यान मध्य रेल्वेमार्गावरून लोकल प्रवास करत होता. लोकलला गर्दी असल्यामुळे त्याला डब्यात आत जाता आले नाही. तो लोकलच्या दाराजवळच उभा राहिला. यावेळी गर्दीमुळे हात सटकून तेजस खाली पडला. लोकलमधून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला.

प्रवाशांनी गंभीर जखमी झालेल्या तेजसला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या अपघाताची नोंद ठाणे लोहमार्ग पोलिसांनी करून घेतली असून ते तपास करत आहेत. या घटनेच्या प्राथमिक तपासात लोकलमधील गर्दीमुळेच तोल जाऊन हा अपघात घडल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.

तेजस पवार एका महिला नातेवाईकासह दादरला जात होता. दादर येथे त्याच्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यामुळे तो अंत्यविधीसाठी निघाला होता. पण वाटेतच काळाने घाला घातला. तेजससोबत जी महिला नातेवाईक होती तिला तेजस लोकलमधून खाली पडला असल्याचे कळालेच नाही. ती दादरपर्यंत तशीच गेली. दादर रेल्वे स्थानकावर पोहचल्यानंतर तिला तेजसचा मृत्यू झाल्याचे कळाले तेव्हा तिला धक्का बसला. तेजस पवारच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते पुणे प्रवास अधिक वेगवान, मुंबईहून ४८ मिनिटात पुण्यात पोचणार

Best Strike : मुंबईकरांचे हाल होणार, BEST चे हजारो कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, या आहेत प्रमुख मागण्या

भिवंडी हादरली! चिकन शाओर्मा, पिझ्झा खाल्ल्याने १४ जणांना विषबाधा; अचानक उलट्यांचा त्रास अन्...

ट्रम्प झुकले, आखातात शांतता, इराण-अमेरिकेत 'व्हर्साय' करार, य़ुद्धबंदीच्या करारात नेमकं काय?

MLA Convoy Accident: विवाह समारंभातून परतताना आमदाराच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या

SCROLL FOR NEXT