अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचा अपघात कसा घडला? कंटेनर चालकानं दिली धक्कादायक माहिती

Jitendra Shelke Accident Latest Update Driver Statement: जितेंद्र शेळके अपघात प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. कंटेनर चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रेडिएटर लीकमुळे गाडीचा वेग कमी होता, मात्र मागून आलेल्या कारने धडक दिली. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या अपघात प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. कंटेनर चालकाची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात चौकशी झाली असून यावेळी कंटेनर चालक वारीसनं कालच्या अपघात प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. हैदराबादवरून अहमदाबादकडे जात असताना कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्यानं गाडी गरम झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या बाजुनं हळूहळू जात असताना मागून कार येऊन धडकली. माझी गाडी थांबलेली नव्हती फक्त वेग कमी होता अशी माहिती कंटेनर चालकानं दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com