Mumbai Local Mega Block  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Priya More

लोकलने प्रवास (Mumbai Local) करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी म्हणजेच २३ जून २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) घेण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे. नाहीतर त्यांना प्रवास करताना त्रास होऊ शकतो. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर तर पश्चिम रेल्वेच्या माहीम ते गोरेगाव अप- डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत सीएसएमटी ते विद्याविहार अप - डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. यादरम्यान लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन धीम्या मार्गावर मार्गावर वळविण्यात येणार आहेत. घाटकोपरवरून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकलसेवा विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११. १० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणा आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी /वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तर सीएसएमटी येथून येथून वांद्रे/गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील. तर, पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सीएसएमटीकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. अशामध्ये ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत माहीम ते गोरेगाव अप - डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वांद्रे आणि सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गावरील लोकलसेवा आणि काही चर्चगेट- गोरेगाव धीमी अप- डाऊन लोकलसेवा रद्द असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Maharashtra Live News Update : महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

SCROLL FOR NEXT