Mumbai Mega Block  x
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक! प्रवाशांचे हाल होणार, रविवारी कशी असणार लोकलची स्थिती?

Mumbai Local Mega Block : रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार १ जून रोजी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक जारी केले आहे.

Yash Shirke

Mumbai Mega Block News : मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक ०१.६.२०२५ रोजी उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. मेगा ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील, त्यानंतर भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर आणि सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत वांद्रे - गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.१३ पर्यंत गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा बंद राहतील.

ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT