Mumbai AC Local  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, २३८ नवीन एसी लोकल धावणार; काय आहे प्लान?

Good News For Mumbaikar: मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच गारेगार आणि सुसाट होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने २३८ नवीन एसी लोकल सुरू करण्याची योजना आखली असून या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

Priya More

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईचा लोकल प्रवास आता आणखी गारेगार आणि सुखकारक होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित म्हणजेच एसी लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा प्लान केला आहे. केंद्र सरकारने २३८ नवीन एसी लोकल गाड्यांच्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संसदेमध्ये मुंबईच्या लोकल प्रवासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. वर्षा गायकवाड यांनी मुंबई लोकल प्रवासाचे वास्तव संसदेत सांगितले. यावेळी त्यांनी विरार- चर्चगेट आणि कल्याण -सीएसएमटी प्रवास करण्याचे आवाहन केले.

त्याचसोबत लोकल प्रवासादरम्यान २४६८ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि २६९७ जण जखमी झाले असल्याची माहिती देखील त्यांनी संसदेत सांगितली. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर देताना मुंबईत २३८ नव्या एसी लोकल लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली.

मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर १०९ एसी लोकल धावतात. या गाड्या आठवड्याच्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटी ६५ सेवा चालवतात. तर उपनगरीय मार्गांवर अलीकडेच १३ नवीन एसी लोकल सेवांचा समावेश करण्यात आला आहे. हा विस्तार एकूण सेवा सुधारण्यासाठी आणि अधिक आरामदायी प्रवास पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबईत सध्या ३५०० लोकल सेवा सुरू आहेत. रेल्वेकडून येत्या काळात आणखी ३०० लोकल सेवा सुरू होणार आहेत. त्यासाठी १७,१०७ कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये १.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे नेटवर्क अंतर्गत २५ डिसेंबर २०१७ रोजी एसी लोकल ट्रेन सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या पाच महिन्यांतच एसी लोकला प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ५,००,००० हून अधिक प्रवाशांनी तेव्हा लोकल प्रवास केला. सध्या उन्हाळ्यामध्ये एसी लोकलची मागणी वाढली आणि दरमहा ३,००,००० हून अधिक प्रवाशांनी एसी लोकलचा पर्याय निवडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT