
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळत आहे. मुंबई सारख्या शहरातील परप्रांतायींकडून मराठी माणसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहे. मागील काही महिन्यांपासून घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आहे. परप्रांतीयांच्या मुजोरीचा राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरही घटना वाढताना दिसत आहे. यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. समाजात सामाजिक एकात्मता, सलोखा काय राहिला नाही, तर देश पुढे कसा जाणार? असा सवाल करत खासदार वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली.
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'महाराष्ट्रात दुर्दैवाने सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम सुरु आहे. जातपात, भाषेमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. आता लोकांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा धाक दिसत नाही. सामाजिक सलोखा बिघडवणारे वक्तव्य राजकीय नेत्यांकडून करण्यात येतात. एकमेकांमध्ये द्वेष पसरवण्यात येतो. घाटकोपर, ठाणे, सांताक्रुजची घटना या सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटना आहेत.
'बीड आणि परभणीत जातीयवादातून घटना घडल्या आहेत. स्थानिक वादातून घटना घडल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा धाक राहणार नाही, तोपर्यंत अशा घटना घडत राहणार आहेत. सामाजिक सलोखा न बिघडवण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. मंत्री देखील सामाजिक सलोखा बिघडवणारं वक्तव्य करत असेल, तर काय होणार', असे त्या म्हणाल्या.
'महाराष्ट्रात जातीजातीत, भाषेवरून राजकारण झालं. जे मगरूर आहेत, त्यांना आणखी मगरूर करण्याचं काम झालं. पोलिसांचा धाक असला पाहिजे, दुर्दैवाने त्यांचं खच्चीकरण झालं आहे. पोलिस महासंचालकांनी मान्य केलं होतं की, त्यांचा पूर्वीसारखा धाक राहिलेला नाही. त्याचं कारण काय, म्हणजे त्यांचंही मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, असं मत खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं.
'एखादा राजकीय नेता म्हणत असेल की, मी उचलून फेकून देईल. त्यांच्या बायकांबद्दल बोललं जातं. त्यांच्याकडे प्रतिक्रिया काय राहणार. जोपर्यंत पोलिसांना स्वातंत्र्य राहणार नाही, तोपर्यंत पोलिसांचा धाक होणार नाही. तोपर्यंत जात, भाषा, प्रांतावरून चालेल्या गोष्टी थांबणार नाहीत. आज प्रत्येकाला मी म्हणेन तसा कायदा वाटत आहे. पण हा देश कायद्याने चालतो. पोलिसांना स्वातंत्र्य द्यायला हवं. आता राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा, धनगर विरुद्ध आदिवासी वातावरण झालं आहे. आता मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण झाला आहे. हे सर्व कशासाठी चाललं आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.
'सरकारने स्वत: यात लक्ष दिलं पाहिजे. जे मंत्री संविधानाची शपथ घेतात, ते काही वक्तव्य करतात. ते काय तऱ्हेने बोलतात. काही मंत्री केरळला काही म्हणत असेल, ही बाब शोभते का? त्यासाठी यांना आमदार केलं आहे का? या सारख्या नेत्यांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होते. आपल्या महाराष्ट्राची प्रतिमा पुरोगामी महाराष्ट्र अशी आहे ना? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यांचा महाराष्ट्र आहे. ते रयतेचे राजे होते. सर्व धर्मींयांचे राजे होते. अठरा पगड जातीचे राजे म्हणून त्यांना पाहिलं जातं. आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे? या प्रकरणाला कोण खतपाणी घालत आहे? हे दबावाचं राजकारण आहे. हे बरोबर नाही. सामाजिक एकात्मता, सलोखा काय राहिला नाही, तर देश पुढे कसा जाणार? त्याचे दुरोगामी परिणाम खूप वाईट आहे, असा इशारा खासदार गायकवाड यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.