Congress MP : भांडणात मध्यस्थी केली, अंगाशी आली, जमावानं फोडलं खासदाराचं डोकं

Fight News : काँग्रेसचे खासदार मनोज कुमार हे एका मिरवणूकीत सामील झाले होते. मिरवणूकीतील लोकांचे काही बसचालकाशी भांडण झाले. वाद मिटवण्यासाठी मनोज यांनी मध्यस्ती केली. पण या प्रयत्नांमध्ये त्यांनाच मार खावा लागला.
congress mp beaten by mob
congress mp beaten by mobsaam tv
Published On

Congress MP : काँग्रेसच्या एका खासदाराला भांडण सोडवायला जाणं महागात पडलं आहे. बिहारच्या सासाराम लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनोज कुमार मिरवणूकीमध्ये सामील झाले होते. तेव्हा मिरवणूकीतील लोक आणि एका शाळेच्या बस चालकांमध्ये वाद सुरु झाला. मनोज कुमार यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनाच मार खावा लागला.

खासदार मनोज कुमार यांचा भाऊ पीएसीएस निवडणुकीत विजय झाली. या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली होती. यात मनोज कुमारही होते. ही मिरवणूक बिहारच्या नाथोपूर गावाच्या सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल या शाळेजवळून जात होती. दरम्यान मिरवणूकीतील लोकांनी शाळेच्या बसचालकांशी वाद घातला आणि शाळेजवळच राडा सुरु झाला.

भांडण सोडवण्याच्या उद्देशाने मनोज कुमार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण हाणामारीत जमावाने त्यांना चोप दिला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याची माहिती समोर आली आहे. भांडण सुरु असताना काही लोक काठ्या घेऊन आले. त्यांना समजवण्याचा प्रयत्न मनोज यांनी केला. पण हल्लेखोरांनी मनोज यांना मारहाण करायला सुरुवात केली, असे मनोज कुमार यांचे बंधू मृत्यूंजय भारती यांनी सांगितले.

congress mp beaten by mob
Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्यात सापडला नवरा, २७ वर्षांपूर्वी झाला होता बेपत्ता; संन्यास घेऊन बनला अघोरी

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोहनिया आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी खासदार मनोज कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

congress mp beaten by mob
Maha Kumbh Mela: महाकुंभ मेळ्यात पुन्हा अग्नितांडव! छतनाग घाटाजवळील तंबूंना भीषण आग, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com