Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्यात सापडला नवरा, २७ वर्षांपूर्वी झाला होता बेपत्ता; संन्यास घेऊन बनला अघोरी

Maha Kumbh 2025 Viral Story : झारखंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे हरवलेले पती तब्बल २७ वर्षांनी महाकुंभमेळ्यात सापडले आहेत. १९९८ मध्ये ते बेपत्ता झाले होते. त्यांना शोधण्यासाठी घरच्यांनी खूप मेहनत घेतली होती.
Wife found her husband as aghori baba in kumbhmela
Wife found her husband as aghori baba in kumbhmelaChatgpt
Published On

Maha Kumbh 2025 : बॉलिवूडच्या बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये 'कुंभ के मेले में बिछडना' हे दृश्य आपण पाहिले असेल. कुंभमेळ्यात हरवलेले भाऊ खूप वर्षांनी एकमेकांना भेटले अशा गोष्टीही ऐकल्या असतील. अशीच एक घटना खरोखर घडली आहे. तब्बल २७ वर्षांनी एका महिलेची तिच्या पतीची भेट झाली आहे. या महिलेचा नवरा यंदाच्या महाकुंभमेळ्यात सापडला आहे. ही महिला झारखंडमध्ये तिच्या परिवारासह वास्तव्य करत आहे.

'धनवा देवी' नाव असलेल्या महिलेचा पती १९९८ मध्ये अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी तिच्या पतीला शोधण्याचे खूप प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी परिस्थिती स्विकारत धनवा देवी यांनी दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. २७ वर्षांनंतर त्यांचा बेपत्ता झालेला पती महाकुंभमेळ्यात सापडला.

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात धनवा देवी यांच्या एका नातेवाईकाची नजर एका अघोरी साधू बाबांवर गेली. त्या साधूंचा चेहरा हा धनवा देवींच्या पतीसारखा वाटला. नातेवाईकाने ही खबर कुटुंबीयांना दिली. सुरुवातीला सर्वांना भ्रम वाटला. पण ओळख काढल्यावर ते अघोरी साधू धनवा देवींचे पती 'गंगासागर यादव'च आहेत हे स्पष्ट झाले.

Wife found her husband as aghori baba in kumbhmela
Mahakumbh Mela: महाकुंभात गर्दीचा कहर! लोकांचा जीव वाचवताना पोलिसानं गमावला स्वतःचा जीव

महाकुंभमेळ्यातील 'राजकुमार बाबा' हेच गंगासागर यादव असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. ही गोष्ट खरी आहे की खोटी हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. कुंभमेळ्यात बरेचजण हरवतात. पण २७ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती महाकुंभमेळ्यामुळे भेटल्याची ही गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Wife found her husband as aghori baba in kumbhmela
Maha Kumbh 2025 : हवाई सुंदरी होणार साध्वी? महाकुंभमेळ्यात घेणार दीक्षा, लाखो पगाराच्या नोकरीचा करणार त्याग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com