Maha Kumbh 2025 : हवाई सुंदरी होणार साध्वी? महाकुंभमेळ्यात घेणार दीक्षा, लाखो पगाराच्या नोकरीचा करणार त्याग

Maha Kumbh Mela 2025 : यंदाचा महाकुंभमेळा साधू-संतांपेक्षा मॉडेल आणि सिनेअभिनेत्रींमुळेच चर्चेत आहे. त्यात आणखी एका हवाई सुंदरीची भर पडलीय. कोण आहे ही हवाई सुंदरी पाहूयात विशेष रिपोर्ट.
Maha Kumbh Air hostess
Maha Kumbh Air hostessSaam Tv (Youtube)
Published On

Maha Kumbh Mela 2025 : १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा हा सर्वार्थानं विलक्षण ठरतोय. या महाकुंभमेळ्यात मॉडेल हर्ष रिछारिया, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी, आयटीबाबांची जोरदार चर्चा रंगली. आता यात आणखी एक भर पडलीय. ती म्हणजे हवाई सुंदरीची. ममता कुलकर्णीनंतर आता डीजा शर्मा ही हवाई सुंदरीही साध्वी होण्यासाठी दीक्षा घेणार आहे. डीजा शर्मा एम कॉम झाली असून हवाई सुंदरी म्हणून तिला लाखोंचा पगार आहे. मात्र या सर्वांचा त्याग करून तिंनं थेट दिक्षा घेऊन साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय. तिनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय. पाहुया.

हवाई सुंदरी होणार साध्वीची पोस्ट

मी लवकरच दीक्षा घेऊन संन्यास घेणार आहे. माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या आयुष्यात काहीही उरलेलं नाही. आपण जितकं धार्मिक राहू आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवू तितकी मानसिक शांती मिळेल. तुम्ही तुमचं दु:खं लोकांसमोर मांडाल तर ते कमी न होता वाढत जाईल. त्यामुळे देवाचं नाव घेत राहा.

Maha Kumbh Air hostess
Ind vs Eng T 20 Match: भारत-इंग्लंड टी-२० मॅचवर GBS चं सावट, कशी घेणार खबरदारी? वाचा

हवाई सुंदरी डिझा शर्मानं संन्यास घेण्याचा निर्णय इंस्टाग्रामवर जाहीर केल्यांनंतर अनेकांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप करत टिका केलीये. हवाई सुंदरी डिझा शर्मा साध्वी बनेल किंवा नाही हे येणाऱ्या काळात कळेलच परंतू नेम-फेम-गडगंज श्रीमंती असली तरी मन:शांतीसाठी अध्यात्माच्या मार्गाला जात असल्याचं चित्र या महाकुंभमेळ्यात दिसून येतय.

Maha Kumbh Air hostess
Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्यात 30 भाविकांचा मृत्यू, अमृतस्नानाचा हट्ट बेतला जीवावर; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com