Mumbai Local : मुंबईच्या 'या' मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक वाचा

Mumbai Local Mega Block Sunday Schedule: जर तुम्हीही रविवारी कोणताही प्लान आखत असाल आणि लोकलने प्रवास करणार असाल, तर मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.
Mumbai Local Mega Block
Mumbai Local Mega BlockSaam TV
Published On

संपूर्ण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रविवार असल्यानं अनेक मुंबईकर हे फिरण्याचा आणि शॉपिंगचा प्लान करतात. जर तुम्हीही रविवारी कोणताही प्लान आखत असाल आणि लोकलने प्रवास करणार असाल, तर मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण सेंट्रल आणि हार्बर या २ मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. १३ मार्च रविवारी ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर लोकल सेवा सुरू राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी ०३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

Mumbai Local Mega Block
Latur Crime: भर रस्त्यात २ टोळक्यांमध्ये राडा, फिल्मी स्टाईल हाणामारी; लोखंडी रॉडनं फोडलं, नंतर दगडानं ठेचलं

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल गाड्या त्यांच्या थांबव्याव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. तसेच पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

Mumbai Local Mega Block
Swargate Bus Depot: दत्ता गाडे आयुष्यभर तुरुंगात राहणार, जन्मठेपेची शिक्षा?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत (नेरुळ/बेलापूर-उरण बंदर मार्ग वगळता).सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत बंद राहतील.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com