Central Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वांगणी-बदलापूरदरम्यान तांत्रिक बिघाड; कामाला निघालेल्या प्रवाशांचे हाल

Central Railway: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांगणी- बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे कर्जतकडे जाणारी आणि मुंबईच्या दिशेला येणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला.

Priya More

Summary -

  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • वांगणी–बदलापूरदरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाली

  • कर्जत–मुंबई दिशेकडील लोकल सेवांवर मोठा परिणाम

  • ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

मयुरेश कडव, बदलापूर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांगणी- बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मुंबईवरून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलसेवेवर देखील परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने कामसाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जतहून मुंबईकडे आणि मुंबईहून कर्जतकडे जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे मेल एक्स्प्रेस गाड्या ऑटोमॅटिक पद्धतीने थांबत आहेत. त्यामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल रखडल्या आहेत. त्याचा परिणाम अप दिशेकडील वाहतुकीवरही होत आहे.

वांगणी-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे दोन्ही दिशेकडील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. मुंबईच्या दिशेला येणाऱ्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे आज प्रवाशांना ऑफिसला लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावंतवाडीत महसूल विभागाची मोठी कारवाई, अवैध वाळू वाहतूक करणारे ६ डंपर जप्त

Shocking: आईनं पोटच्या ५ मुलांना विकलं, नाशिकमधील संतापजनक प्रकार; धक्कादायक कारण समोर

Satbara : सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार, तुकडेबंदी कायद्यात मोठी सुधारणा

दुर्देवी! क्रिकेट खेळताना खेळाडूचा दुर्देवी मृत्यू; चक्कर आल्यानं तरूण खाली कोसळला अन्...

Pune : बँकॉकवरून पुण्यात २.२९ कोटींचा गांजा घेऊन आला, पण विमानतळावरच डाव फसला, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT