Mumbai Home Selling Decrease Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Home Selling Decrease: मुंबई, पुण्यात घर खरेदी घटली; नेमकी कारणे काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतातील आठ मुख्य निवासी बाजारपेठांमध्ये एप्रिल ते जून या वर्षाच्या दुस-या तिमाहीत घरांची विक्री ६%ने कमी झाली असून मुंबईतील घरांच्या विक्रीत ८ टक्क्यांची घसरण झाली असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम या डिजिटल रियल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने केलेल्या तिमाही विश्लेषणात असे दिसून आले आहे. प्रॉपर्टी ब्रोकरेज प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर हा हाऊसिंग डॉटकॉमच्या मालकीच्या आरईए इंडियाचा एक भाग आहे. कंपनीने ‘रियल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२४’ अहवालात घरांची मागणी आणि पुरवठा यासंबंधीची तिमाही आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालात मुंबई एमएमआर, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि दिल्ली एनसीआर या शहरांचा समावेश आहे.


आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीत या घरांची विक्री ६ टक्क्यांनी घसरून १,१३,७६८ युनिट्सवर आली असून आधीच्या जानेवारी-मार्च या पहिल्या तिमाहीत ती १,२०,६४२ युनिट्स होती. तिमाही विक्रीत झालेली ही घट फक्त बंगळूर ३०% वाढ) आणि दिल्ली-एनसीआर (१०% वाढ) चा अपवाद वगळता देशात सर्वत्र दिसून आली. तर एप्रिल-जून तिमाहीत नवीन पुरवठा जानेवारी-मार्च कालावधीतील १,०३,०२० वरून १ टक्क्यांनी कमी होऊन १,०१,६७७ युनिट्सवर आला.

प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख आणि आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ श्री. विकास वधावन म्हणाले, “एप्रिल ते जून चा कालावधीत सार्वत्रिक निवडणुकांमुळे घरांची मागणी माफक राहिली असली तरी मजबूत मूलभूत कारणांमुळे रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीबाबत ग्राहकांचे विचार खूपच सकारात्मक होते. केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर गुंतवणुकीस प्रोत्साहन देणारे बजेट येईल ही अपेक्षा असल्याने आगामी तिमाहींमध्ये, विशेषतः सणासुदीच्या मोसमात विक्रीचे आकडे मजबूत होतील याची आम्हाला खात्री वाटते.”

मुंबई एमएमआर, पुण्यात गृहविक्रीत घट:

तिमाही आकडेवारीनुसार मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर)मध्ये घरांची विक्री ४१,९५४ युनिट्सवरून ८ टक्क्यांनी घसरून ३८,२६६ युनिट्सवर आली. तर पुण्यातील घरांची विक्री एप्रिल ते जून या कालावधीत ५ टक्क्यांनी घसरून २१,९२५ युनिट्सवर आली आहे, जी मागील तिमाहीत २३,११२ युनिट्स होती. अहमदाबादमधील घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये २६ टक्क्यांनी घसरून ९,५०० युनिट्सवर आली आहे जी यावर्षी जानेवारी-मार्च दरम्यान १२,९१५ युनिट्सवर होती. बंगळुरूमध्ये मात्र १०,३८१ युनिट्सवरून विक्री ३० टक्क्यांनी वाढून १३,४९५ युनिट्स झाली. चेन्नईतील निवासी मालमत्तांची विक्री ४,४२७ युनिट्सवरून १० टक्क्यांनी घसरून ३,९८४ युनिट्सवर आली आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये विक्री १० टक्क्यांनी वाढून १०,०५८ युनिट्सवरून ११,०६५ झाली. हैदराबादमधील घरांची विक्री १४,२९८ वरून १४ टक्क्यांनी घसरून १२,२९६ युनिट्सवर आली आहे. कोलकात्यात विक्री ३,८५७ वरून १६ टक्क्यांनी घसरून ३,२६७ युनिट्सवर आली.

नवीन पुरवठ्यात अहमदाबाद, बंगळुरूमध्ये सर्वाधिक वाढ:

अहवालातील तिमाही आकडेवारीनुसार अहमदाबादमध्ये नवीन पुरवठ्यात पहिल्या तिमाहीच्या ३११६ युनिट्सच्या तुलनेत ११० टक्क्यांची वाढ झाली असून ६५३३ युनिट्सवर पोहोचली आहे. बंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्येही नवीन पुरवठ्यात अनुक्रमे २६ टक्के, १७ टक्के आणि १० टक्क्यांची वाढ झाली असून युनिट्सची संख्या अनुक्रमे १२,५६४, ८०५३ आणि ४०,४६२ वर पोहोचली आहे. तर चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि पुण्यात नवीन पुरवठ्यात अनुक्रमे २ टक्के, ५८ टक्के, ४९ टक्के आणि ११ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून युनिट्सची संख्या अनुक्रमे ४,६३३, ६,३६५, ७५३, २२,३१४ वर आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT