Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडव्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात मानला जातो. यंदा 19 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी शक संवत 1948 ची सुरुवात होणार आहे.
हिंदू नववर्षासोबतच चैत्र नवरात्रीचाही प्रारंभ होतो. महाराष्ट्रासोबत कोकणातील हिंदूंसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला तेल लावून अंघोळ करण्याची परंपरा आहे. या मागे धार्मिक तसेच आरोग्याशी संबंधित अनेक कारणं सांगितली जातात. चला जाणून घेऊया.
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी तेल लावून स्नान केले जाते. जसं आपण आपण दिवाळीत पहाटे करतो.
तिळाचे किंवा सुगंधी तेल शरीराला लावल्यावर शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि दिवसभर अगदी ताजेतवानं किंवा फ्रेश वाटतं.
तेलाने मालिश केल्यावर त्वचा मऊ आणि निरोगी राहते. त्वचेतील कोरडेपणा कमी होतो. तेल लावल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
तेलाने मालिश केल्याने शरीर रिलॅक्स होतं आणि मनालाही शांतता मिळते. आयुर्वेदानुसार तिळाचे तेल शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे सणाच्या दिवशी तेलाने स्नान करण्याची परंपरा आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.