Bullet Train: अहमदाबाद-मुंबईनंतर देशात आणखी एक बुलेट ट्रेन; दिल्ली-पाटणा प्रवास होणार ३ तासांत

Delhi Howrah Bullet Train: मुंबई- अहमदाबादनंतर आता देशात आणखी एक बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. दिल्ली ते हावडा ही बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. यामुळे दिल्ली ते पाटणा हे अंतर फक्त तीन तासात गाठता येणार आहे.
Delhi Howrah Bullet Train
Delhi Howrah Bullet TrainSaam Tv
Published On

दिल्ली ते पाटणा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली ते पाटणा प्रवास आता फक्त ३ तासात होणार आहे. दिल्ली ते पाटणा या प्रवासासाठी १७ तास लागायचे. लवकर दिल्ली ते पाटणा बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. याचाच अर्थ आता जवळपास १४ तास वाचणार आहेत.

दिल्ली हावडा मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. अहमदाबाद-मुंबईनंतर आता दिल्ली हावडा बुलेट ट्रेनचे काम जलद गतीने सुरु आहे. दिल्ली हावडा मार्गावक धावणारी बुलेट ट्रेन बक्सर, पाटणा आणि गया मार्गे जाणार आहे. यासाठी या तिन्ही जिल्ह्यात स्थानक तयार करण्यात येणार आहे. ही बुलेट ट्रेन ३५० किमी ताशी वेगाने धावणार आहे. याआधी दिल्ली ते पाटना प्रवासासाठी १७ तास लागायचे.

दिल्ली ते हावडा बुलेट ट्रेन सुरु झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. बुलेट ट्रेनसाठी बिहारमधील एलिव्हेटेड ट्रॅकचा मार्ग निश्चित केला आहे. या ठिकाणी स्टेशन आणि एलिव्हेटेड ट्रॅक बांधण्यासाठी भूसंपादनाचे काम लवकरच सुरु होणार आहे.

Delhi Howrah Bullet Train
Rashtrapati Bhavan Leopard Viral Video: राष्ट्रपती भवनात दिसलेल्या त्या प्राण्याचं रहस्य आलं समोर; दिल्ली पोलिसांनी उकललं गुढ

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन

अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनदेखील लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पांतर्गत नवी मुंबईतील ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे.

Delhi Howrah Bullet Train
PM Modi Cabinet: भाजपची नवी रणनिती? PM मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ६ माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com