PM Modi Cabinet: भाजपची नवी रणनिती? PM मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ६ माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश

Former CM New Modi Cabinet Sworn: केंद्रात ९ जून रोजी एनडीएचे सरकार स्थापन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात तीन माजी मुखमंत्र्यांचा समावेश आहे.
मोदींचं नवीन मंत्रीमंडळ
PM Modi Cabinet Saam Tv

देशात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झालं आहे. ९ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींसोबत ७१ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. २०१९ पासून मागील सरकारचा भाग नव्हते, अशा नेत्यांना प्रमुख खात्यांचं वाटप करण्यात आलंय. सहा माजी मुखमंत्र्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या यावेळी मोदींच्या कॅबिनेटमध्ये देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मंत्री म्हणून पदार्पण करणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास ही महत्त्वाची मंत्रालये देण्यात आली आहेत. ते भाजपचे जेष्ठ नेते (PM Modi Cabinet) आहेत. ते मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी विदिशामधून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा भाग नव्हते. आता त्यांना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री तसंच ऊर्जा मंत्री करण्यात आलं आहे. खट्टर यांनी सार्वत्रिक निवडणुकीत कर्नाल लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला (PM Modi Oath Ceremony) आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे नेते जीतन राम मांझी यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद देण्यात आलं आहे.

मोदींचं नवीन मंत्रीमंडळ
PM Modi Cabinet Formation: रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांची खाती ठरली! नेमकी नवी जबाबदारी आता काय? वाचा सविस्तर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी २०१४ ते २०१९ या पहिल्या मोदी सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून काम केले (NDA) होते. आता पुन्हा ते रसायने आणि खते मंत्रालयाचे नेतृत्व करणार आहेत. एनडीएमधील सहयोगी जनता दल पक्षाचे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालये देण्यात आली आहेत.

ज्येष्ठ जनता दलाचे नेते राजीव रंजन सिंग उर्फ ​​लालन सिंग यांची पंचायत राज मंत्री तसेच मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली (New Modi Cabinet) आहे. तेलगू देसम पार्टीचे किंजरापू राममोहन नायडू हेनागरी विमान वाहतूक मंत्री आहेत. लोक जनशक्ती पार्टी एलजेपीचे नेते चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.

मोदींचं नवीन मंत्रीमंडळ
PM Narendra Modi Salary: देशाचा कारभार पुन्हा मोदींच्या हातात! पंतप्रधानांना नेमका पगार किती? माहित असायलाच हवं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com