Gangappa Pujari
देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली.
काल देशातील नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.
यावेळी पंतप्रधान मोदींसह ७२ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
सलग तिसऱ्यांदा देशाचा कारभार पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पगार किती मिळतो अन् कोणत्या सुविधा मिळतात? माहित आहे का?
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींना पगार म्हणून दरमहा १. ६६ लाख रुपये पगार मिळेल. यामध्ये 50 हजारांच्या पगारासह, 3000 रुपयांचा खर्च भत्ता, 45000 रुपयांचा एक पक्ष, 2000 रुपये दैनिक भत्ता याचा समावेश आहे.
पगाराशिवाय पंतप्रधानांना अनेक सुविधा मिळतात. ज्यामध्ये सरकारी घर, एपीजी सुरक्षा, मोफत आंतरराष्ट्रीय प्रवास, सरकारी वाहन आणि विमान आणि अन्न खर्च, दूरध्वनी कनेक्शन, कर्मचारी उपलब्ध आदींचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय भेटींसाठी सरकारकडून भाडे, मुक्काम आणि जेवण खर्चाचा समावेश आहे. तसेच सेवानिवृत्तीनंतरही त्यांना पाच वर्षांसाठी घरे, वीज, पाणी, एसपीजी सुरक्षा मिळते.
या व्यतिरिक्त, त्यांना बरेच कर मुक्त भत्ते देखील मिळतात, ज्यात ट्रेन आणि विमानातून विनामूल्य प्रवास, घर, वैद्यकीय सेवा आणि कार्यालयीन खर्चासाठी दरवर्षी 1 लाख रुपये दिले जातात.