mumbai fire update  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : विमानतळाजवळील फाईव्ह स्टार हॉटेलला भीषण आग, आकाशात काळ्या धुराचे लोट, VIDEO

Mumbai Fire update : मुंबईच्या अंधेरीतील फाईव्ह स्टार हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहेत. या हॉटेलला आग लागल्यानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Fire : मुंबईत आगीच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या विमानतळाजवळील एका फाईव्ह स्टार हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या सहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या आगीच्या घटनेनंतर लोकांची एकच धावाधाव झाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विमानतळाजवळील फेअरमॉन्ट हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे. सहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असणाऱ्या फेअरमॉन्ट हॉटेलला आग लागली. या आगीची माहिती मिळवल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. हॉटेलला आग लागल्यानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट पसरत होते.

आगीच्या घटनेनंतर हॉटेलमधील नागरिकांची एकच धावाधाव झाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही. आगीत नेमकं किती नुकसान झालं, याची अधिकृत माहिती हाती आलेली नाही. फेअरमॉन्ट फाईव्ह स्टार हॉटेलला नेमकी आग कशी लागली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आग कशी लागली?

हॉटेल फेअरमॉन्टच्या टेरेसवरील एसी कंप्रेसर फुटल्यामुळे आग लागल्याची घटना घडल्याचे समोर आलं आहे. अग्निशमन दलाच्या १५ पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्याची माहिती हाती आली आहे. आग लागल्यानंतर तब्बल दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

दक्षिण मुंबईत उंच इमारतीला आग

मुंबईतील दक्षिण भागातील मेट्रो सिनेमाजवळ एका इमारतीच्या सर्वात मजल्याला आग लागल्याची घटना घडलीये. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. गोल मशीद येथून जवळ असलेल्या एका इमारतीच्या आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच काही नागरिकांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT