Building Redevelopment: तुमची बिल्डिंग आता तुम्हीच करा रिडेव्हलप; 1400 स्क्वेअर फुटांचं घर मिळवा!

Self-redevelopment Process : तुमची सोसायटी जुनी झाली आली आहे. त्यामुळे तुम्ही रिडेव्हल्पमेंटसाठी बिल्डरकडे जात असाल तर थांबा. कारण तुम्ही स्वत: विकासक झालात, तर तुम्हाला आणखी मोठं घर मिळवू शकता. त्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट...
Self-redevelopment building
Self-redevelopment in Mumbai :Saam tv
Published On

अनेकांना स्वत:चं मोठं घर असावं ही मनोमन इच्छा असते. अनेक जण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतात. घराचं स्वप्न पूर्ण सत्यात उतरवण्यासाठी अनेकांना जीवाचं रान करताना पाहिलं असेल. तुम्ही राहत असलेली इमारत जुनी झाली असेल. तर तुमची इमारत रिडेव्हलपमेंट करण्यााठी एखादा बिल्डर शोधत असाल, तर थोडं थांबा. तुम्ही आता स्वत: तुमच्या इमारतीचा विकास करु शकतात. मुंबईत असे सेल्फ रिडेव्हलपमेंटचे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. अनेकांना इमारतीच्या सेल्फ रिडव्हलपेंटनंतर दहापट मोठं घर मिळालं आहे.

Self-redevelopment building
Top Buildings: जगातली सर्वात मोठी इमारत कोणती?

मुंबईतील विलेपार्ले पूर्व भागात नंददीप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा पुनर्विकास खासगी विकासकाची मदत न घेता एकूण १६ सभासदांनी स्वत:च करून नवा पायंडा घातलाय. त्यांनी त्यांच्या १० मजली नव्या इमारतीत एकूण 21 सदनिका बांधल्या. त्यानंतर दलालांविना त्यांची यशस्वीरित्या सभासदांमध्ये विक्री देखील केली. त्यांनी हा स्वयंपूर्णविकास कोणत्याही विकासकाकडे न जाता किंवा खाजगी बँकेकडे न जाता केला. पुढे मुंबई जिल्हा बँकेच्या सहकार्याने आणि इमारतीतील तीन घरं विक्री करून करण्यात आला आहे. c

Self-redevelopment building
Crime : गर्लफ्रेंडला भेटायला गेला, ७ जणांनी जीव घेतला, कुटुंबियांनी मारेकर्‍याच्या घरासमोरच केला अंत्यविधी

मुंबई जिल्हा बँकेचं अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सोसायटीच्या सभासदांना चाव्या सूपूर्द करण्यात आल्या. स्वयंपूर्ण विकास फायद्याचा आहे, असं आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. पुनर्विकासामुळे अवघ्या अडीच वर्षात सोसायटीतील सभासदांना हक्काचे पहिल्या पेक्षा मोठं घर मिळालंय. सभासदांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळालाय. विशेष म्हणजे पूर्वी 400 चौरस फुटांच्या घरात राहणारे आता एकूण 1400 चौरस फुटांच्या घरात राहण्यास जात आहेत.

Self-redevelopment building
Navi Mumbai Shocking : नवी मुंबई हादरली! रुग्णालयात झोपेत असलेल्या अल्पवयीन मुलावर वॉर्डबॉयकडून अत्याचार

मुंबईसह अनेक अनेक ठिकाणी बिल्डरांची मनमानी पाहायला मिळतेय. काही भागात बिल्डरकडून ग्राहकांची लूट देखील होते. त्यामुळे ग्राहकांना दिलेली आश्वासने कागदावरच राहतात. मात्र, मुंबईच्या विलेपार्लेमधील नंददीप सोसायटीने बिल्डरला टाळून विकसित केलेली ही इमारत आता शहरातील इतर सोसायट्यांनाही खुणावत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com