CM Devendra Fadnavis announcing 500 sq ft affordable homes for Mumbai’s iconic Dabbawalas saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

Chief Minister Fadnavis Announces Housing Scheme For Mumbai Dabbawala: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील डबेवाल्यांसाठी मोठी घोषणा केलीय. डबेवाल्यांना स्वस्त दरात घरे देण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री फडणवीसांनी डबेवाल्यांसाठी ५०० स्क्वेअर फुट घराची घोषणा केली.

  • घराची किंमत २५ लाख २० हजार रुपये असेल.

  • डबेवाल्यांनी १३० वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आहे.

  • ही घोषणा डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनावेळी झाली.

मुंबईतील डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील डबेबाल्यांना त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत घोषणा केलीय. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या डबेवाल्यांना मुंबईत त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. तेही कमीत किमतीत स्वस्तात.

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा'च्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. मुंबईतील डबेवाले हे १३० वर्षांहून अधिक काळापासून सेवा पुरवत आहेत. मुंबईतल्या नोकरदारांचं दुपारचं जेवण हे मोठ्या प्रमाणात डबेवाल्यांवर अवलंबून आहे. या डबेवाल्यांना आता त्यांच्या हक्काचा निवारा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. डबेवाल्यांना मुंबईत २५ लाख २० हजारांत ५०० चौरस फुटांचं घर मिळणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुंदर कार्यक्रम पार पडतोय. डब्बेवाल्यांनी चांगले अनुभव केंद्र उभं केलंय. डबेवाल्यांचा १८९० पासून ते आतापर्यंतचा इतिहास तसेच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत समजला पाहिजे अशी व्यवस्था त्यांनी केलीय. व्हर्चुअल रिॲलिटीच्या माध्यमातून अनुभव घेणं वेगळाच आहे.

रस्त्याच्या घोंगाटापासून ते जेवणाच्या आनंदापर्यंत सगळे काही अनुभवता येतं. तुम्ही कधी एआय वापरलं नाही. मात्र ह्युमन कोडिंग वापरत तुम्ही कम्प्युटरला देखील मागे टाकले. मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे देखील ते पाहून आश्चर्यचकित होतात. एका मिनिटांचाही उशीर न करता, ना एकही चूक न करता. वारी व्यतिरिक्त डबेवाले कोणतीही सुट्टी घेत नाहीत. तसेच निर्व्यसनही राहणं हे प्रेरणादायी आहे.

काही लोकांनी त्यांचा उपयोग केलाय. मात्र त्यांना घर काही मिळालं नाही. आम्ही सांगितलं तुम्ही पुढाकार घ्या आणि आपण कारवाई करू. आता त्यांना मुंबईत हक्काचं घर मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. डबेवाल्यांचा इतिहास गौरवशाली आहे. ज्याप्रमाणे लोकल रेल्वे मुंबईची जीवनवाहिनी आहे, त्याप्रमाणे डबेवालेदेखील मुंबईचे जीवनवाहिनी आहेत. त्यांच्या व्यवस्थापनाचे कौतुक केलं जातं.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लोकलची गर्दी, मुंबईचं ट्रॅफिक अशा साऱ्याच समस्यांतून ते ग्राहकांपर्यंत डबे पोहोचवत असतात. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे जगभर कौतुक झाले आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे पाहाल निकाल?

Maharashtra Leopard Attack: चिमुकलीचा दुर्दैवी बळी; बिबट्यांच्या हल्ल्यांनी हादरलं महाराष्ट्र

Travel Insurance Tips: फ्लाइट रद्द होऊ द्या नाहीतर बॅग हरवू द्या; इन्शुरन्स असेल तर 'डोन्ट वरी', Travel Insurance साठी आत्ताच करा अर्ज

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT