Mumbai Mother Killed Daughter Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुलीचं प्रेमप्रकरण कळताच आई संतापली; रागाच्या भरात पोटच्या लेकीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना

Mumbai Crime News: प्रेमप्रकरणातून निर्दयी आईने पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या वांद्रे परिसरात घडली.

Satish Daud

संजय गडदे, साम टीव्ही मुंबई

Mumbai Mother Killed Daughter

प्रेमप्रकरणातून एका निर्दयी आईने पोटच्या १९ मुलीची गळा दाबून हत्या केली. नंतर फिट आल्याचं सांगून तिच्या मृत्युचा बनाव रचला. मात्र, शवविच्छेदन अहवालातून मुलीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी निर्दयी आईवर खूनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात ही धक्कादायक घटना घडली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भूमिका बागडे (वय १९) असं मृत तरुणीचं नाव असून टीना उमेश बागडे (वय ४०) असं खून करणाऱ्या निर्दयी आईचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्वेकडील (Mumbai News) प्लॉट नंबर ८० येथे राहणाऱ्या भूमिकाचे परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.

दोघेही अधून-मधून एकमेकांना भेटत होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण भूमिकाच्या आईला लागली. यावरून दोघींमध्ये वाद झाला. या वादात मुलीने आईच्या बोटाचा चावा घेतल्याने तिचे बोट तुटून पडले. यानंतर आईने रागातून तिचा गळा दाबून खून केला. (Latest Marathi News)

धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेनंतर आईने स्वत: पोलिसांत धाव घेत भूमिकाचा फिट येऊन मृत्यू झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असता, गळा दाबल्याने तरुणीची हत्या झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

यानंतर पोलिसांनी तरुणीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता, आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली आईने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आईविरोधात कलम 302 आणि 201 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT