Manoj Jarange: मराठ्यांची ९०० एकरवरील विराट सभा कधी होणार? मनोज जरांगेंनी थेट सांगूनच टाकलं

Maratha Aarakshan News: लोकसभा निवडणुकीपूर्वी बीडमध्ये मराठा समाज एकवटणार असून तब्बल ९०० एकरमध्ये जंगी सभा घेणार, अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली.
Maratha Reservation Virat Sabha
Maratha Reservation Virat Sabha Saam TV
Published On

संदीप भोसले, साम टीव्ही लातूर

Maratha Reservation Virat Sabha

लोकसभा निवडणुकीपूर्वी बीडमध्ये मराठा समाज एकवटणार असून तब्बल ९०० एकरमध्ये जंगी सभा घेणार, अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्यामुळे आता या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. मात्र, ही सभा नेमकी कधी होणार? असा मराठा बांधवांना प्रश्न पडला आहे. याबाबत मनोज जरांगेंनी मोठी माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation Virat Sabha
Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत येतंय, तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ; उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ऑफर

विराट सभा घेण्यासाठी आम्हाला ९०० एकर जागा मिळाली आहे. मात्र, आम्ही अजूनही पार्किंगसाठी जागा शोधतोय. लवकरच सभेचं ठिकाणी आम्ही सांगू, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांना सांगितलं. ते लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे बोलत होते.

राज्य सरकारने  मराठा समाजाला (Maratha Reservation) १० टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. मात्र, हे आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. तसेच सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा, अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे.  (Latest Marathi News)

यासाठी जरांगेंनी संवाद यात्रा काढली असून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत. मंगळवारी (ता.१२) जरांगे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करत माध्यमांसोबत संवाद साधला.

मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण मराठा समाजात द्वेष पसरवला आहे, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन राज्य सरकारने कारस्थान रचलं असून हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

"देवेंद्र फडणवीस ट्रॅप रचत असून आम्ही घेत असलेल्या संवाद बैठकावर देखील निर्बंध लागू करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या विराट सभा कशा असतात, हे फडणवीसांना थोड्याच दिवसांत कळेल", असा इशाराही जरांगे यांनी दिलाय. "आम्हाला सभेसाठी ९०० एकरची जागा मिळाली असून आता फक्त पार्किंगसाठी जागा मिळणे बाकी आहे. ती मिळाल्यानंतर आम्ही सभेचं ठिकाण सांगू", असं जरांगेंनी स्पष्ट केलंय.

Maratha Reservation Virat Sabha
Rashi Bhavishya: बुध ग्रहाचा मीन राशीत प्रवेश, मेषसह ५ राशीच्या लोकांचे उजळणार भाग्य, वाचा राशिभविष्य...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com