Mahayuti Seat Sharing: मित्रपक्षाच्या दबावामुळे भाजप बॅकफुटवर? अखेर शिंदे गट अन् राष्ट्रवादीला इतक्या जागा मिळणार!

Mahayuti Seat Sharing Formula: मित्रपक्षाच्या दबावापुढे भाजप बॅकफुटवर गेल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला अधिकच्या जागा सोडण्यास भाजपने तयारी दर्शवली आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde Maharashtra Politics
Ajit Pawar, Eknath Shinde Maharashtra PoliticsSaam TV
Published On

Lok Sabha 2024 Election Mahayuti Seat Sharing

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आचारसहिंता कधीही जाहीर होऊ शकते. असं असताना राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सध्या जागावाटपाबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करीत आहेत. अशातच महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit Pawar, Eknath Shinde Maharashtra Politics
Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत येतंय, तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ; उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ऑफर

राज्यात भाजप लोकसभेच्या ३१ ते ३२ जागा लढविण्यावर ठाम असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाला १२ ते १३ जागा आणि अजित पवार गटाला ४ जागा देण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विचारविनिमय सुरू आहे.

जागावाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. उमेदवार निवडीमध्ये महायुतीकडून धक्कातंत्र वापरण्याची शक्यता असून अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक आहे.  (Latest Marathi News)

महाराष्ट्रात लोकसभेच्या ३२ ते १५ जागांवर भाजप उमेदवार देणार असं दिल्लीतील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरुवातीला सांगितले होते. मात्र, मित्रपक्षाच्या दबावापुढे भाजप बॅकफुटवर गेल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

निवडणूक सन्मानपूर्वक व्हावी या अनुषंगाने भाजप लोकसभेच्या आणखी काही जागा मित्रपक्षाला सोडण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप ३१, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ जागांवर निवडणूक लढवणार, असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.

दरम्यान, जागावाटपात शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण, कीर्तीकर यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून त्यांच्या पुत्रालाच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे ही जागा भाजप लढवण्यास आग्रही असल्याचं कळतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बारामती, शिरूर, रायगड, परभणीची जागा सोडली जाणार असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde Maharashtra Politics
Manoj Jarange: मराठ्यांची ९०० एकरवरील विराट सभा कधी होणार? मनोज जरांगेंनी थेट सांगूनच टाकलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com