Mumbai Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बालपणीची मैत्री, प्रेम अन् मृत्यू… झाडाच्या नंबरवरून 35 दिवसांनंतर हत्येचं गूढ कसं उलघडलं?

Sandeep Gawade

Mumbai Crime News

बॉलिवूड चित्रपट धमालमध्ये 'डब्ल्यू'चा कोड होता आणि याच्या शोधात पोलीस आणि चित्रपटातील पात्रं गोव्यात पोहोचले होते. हा कोड असलेल्या झाडाखाली खजिना दडलेला होता. मात्र ज्याला याची माहिती असते त्याच्या मृत्यू होतो आणि पुन्हा शोध सुरू होतो. मुंबई पोलीस देखील अशाच एका कोडचा शोध लावण्यासाठी 35 दिवस गुंतले होते. हा कोड होता 'L01,501' आणि या कोडमध्ये कोणताही खजिना लपलेला नव्हता, मात्र एका मुलीचा मृतदेह लपवला होता आणि हा कोड रेल्वे रुळांवर सापडलेल्या एका मुलाच्या मृतदेहावर आढळला होता. मुंबईला लागून असलेल्या पनवेल, नवी मुंबईतील कळंबोली परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे.

रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाने आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने प्रेयसीचीही हत्या केली होती मात्र तिचा मृतदेह कोणत्यातरी ठिकाणी लपवून ठेवला होता. मुलाच्या खिशातून एक स्लिप सापडली असून त्यावर 'L01,501' असा कोड लिहिला होता. या कोडचा आणि मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. खारघरच्या डोंगर आणि जंगलात शोधमोहीम राबविण्यात आली पण त्यात यश पोलिसांना यश आलं नाही.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वास्तविक कळंबोली परिसरात राहणारे वैभव आणि वैष्णवी हे लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. वाढत्या वयाबरोबर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. वैभवने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि कॉलेज सोडलं पण वैष्णवी अजूनही मुंबईतील कॉलेजमध्ये शिकत होती. असे असूनही दोघांमधील प्रेम कमी झाले नाही. ते एकमेकांच्या खूप जवळ आले. वैभवने 2023 मध्येच गुपचूप लग्न केल्याचा दावाही केला होता.

या बालपणीच्या प्रेमात मात्र असं काही घडलं की परिणामाची कल्पनाही कोणी केली नसेल. अचानक वैभवच्या मोबाईलवर एक डेथ नोट सापडली ज्यामध्ये लिहिलं होतं. 12 डिसेंबरला वैभव आणि वैष्णवी घरातून बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, वैभवनेच वैष्णवीला भेटण्यासाठी बोलावलं होतं, मात्र त्यानंतर दोघेही सापडले नाहीत. दोघांच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, 12 डिसेंबर रोजी रात्री वैभवचा मृतदेह जुईनगर रेल्वे रुळावर आढळून आला. त्याच्याजवळ एक स्लिप आढळून आली ज्यावर 'L01-501' असे लिहिले होतं. या कोडबाबत पोलिसांची कोंडी झाली. दरम्यान, वैभवच्या मोबाईलमधून आणखी एक दोन पानी सुसाईड नोट सापडली असून त्यात त्याने पहिल्या 2 ते 3 ओळी इंग्रजीत लिहिल्या होत्या.

आता पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता की घनदाट डोंगर आणि जंगलात वैष्णवीला शोधायचं कसं? त्यानंतर अग्निशमन दलापासून ते श्वानपथक, बीएमसी शोध पथक, खासगी बचाव पथक, सिडको पथक, स्थानिक पोलीस शोध पथक अशा सर्व यंत्रणांना तैनात करण्यात आलं, मात्र १२ डिसेंबरपासून बेपत्ता असलेली वैष्णवी कुठेच सापडली नाही. नवीन वर्षाचा पहिला आठवडा उलटून 6 जानेवारी आला आणि पोलिसांच्या अडचणी वाढत गेल्या. 'L01, 501' या कोडबाबत शोध पथकापासून अग्निशमन दल आणि सिडकोपर्यंतच्या अधिकाऱ्यांशी संभाषण झाले. हा कोड क्रॅक करणारा कोणीही पोलिसांना सापडला नाही.

दरम्यान ओवे कॅम्पमध्ये पोलिसांना 'L01, 501' कोड असलेलं झाड सापडलं. पोलीस जेव्हा त्या झाडाजवळ पोहोचले तेव्हा तिथे एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मृतदेहाजवळील कपडे, घड्याळ व इतर वस्तूंवरून तिची वैष्णवी अशी ओळख पटली. आता मोबाईलमध्ये सापडलेली डेथ नोट आणि पेपरमध्ये सापडलेल्या डेथ कोडवरून पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचले होते. वैभवने आधी वैष्णवीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केल्याचं उघड झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT