एपीएमसी मार्केट परिसरात गुहारातहून येणाऱ्या धान्याचे व्यापारी व त्यांच्या वाहनांवर दरोडा घालण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत. एपीएमसी मार्केट परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अवघ्या तासाभरात पोलिसांनी सापळा रचत चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्यात.
त्यांचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेत. पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत. आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला, अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर शफिक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार पसार झालेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक झालेल्या चार दरोडेखोरांकडून पोलिसांनी तीन चाकू, एक मिरची स्प्रेची बाटली, रिक्षा आणि रोकड जप्त केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटमध्ये गुजरातहून येणाऱ्या धान्य व्यापाऱ्यांच्या वाहनांवर दरोडा घालून लुटण्यासाठी काही दरोडेखोर मार्केट परिसरात जमले होते. याबाबतची माहिती कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याची हवालदार सचिन साळवी व पोलीस शिपाई आंधळे यांना मिळाली होती. (Latest Marathi News)
या माहितीच्या आधारे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे , यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते ,विनोद कालेकर यांच्या पथकाने एपीएमसी मार्केट परिसरात सापळा रचला.
या ठिकाणी काही इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या इसमांवर झडप टाकली . चौघांना ताब्यात घेतलं. मात्र यामधील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर शफिक बगला अल्ताफ उर्फ कच्ची व जिओ हे तीन साथीदार पसार झालेत. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.