Anganwadi News: अंगणवाडी सेविकांना न्याय मिळणार का? वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

Anganwadi Sevika Protest: अंगणवाडी सेविकांच्या या प्रश्नांबाबत सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे, असं म्हणत वर्षा गायकवाड अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
Amravati News
Amravati NewsSaam Digital
Published On

Anganwadi Sevika Protest:

राज्यभरातील अंगणवाडी सेविका गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या या प्रश्नांबाबत वास्तविक सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे, असं म्हणत मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पुर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्रही लिहिले आहे.

या पत्रात त्या म्हणाल्या आहेत की, दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य, लसीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये या अंगणवाडी सेविकांचं योगदान खूप मोलाचं आहे. या अंगणवाडी सेविका वेतनवाढीच्या आणि निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी ४ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati News
Ram Temple inauguration: केंद्र सरकारची मोठी घोषणा! अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आपण तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून तोडगा काढावा. तसंच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे रोखून ठेवलेले पगारही त्यांना तातडीने द्यावेत, अशी मागणी पत्राद्वारे वर्षा गायकवाड यांनी केली आहे.  (Latest Marathi News)

Amravati News
Lok sabha 2024 च्या निवडणुकीत भाजप 450 जागांवर उभे करणार उमेदवार? या 4 राज्यांवर केलं सर्वाधिक लक्ष केंद्रित

अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी, या प्रमुख मागण्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांचे पगारही शासनाने अडवून ठेवले आहेत. याबाबत तातडीने निर्णय घेऊन ग्रामीण आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी सरकारने त्वरित योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, अशीही मागणी पत्राद्वारे गायकवाड यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com