Lok sabha 2024 च्या निवडणुकीत भाजप 450 जागांवर उभे करणार उमेदवार? या 4 राज्यांवर केलं सर्वाधिक लक्ष केंद्रित

Lok sabha 2024 News: भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी पक्ष 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक उमेदवार उभे करणार आहे.
Lok sabha 2024
Lok sabha 2024Saam Tv
Published On

BJP Plan For Lok Sabha Election:

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी पक्ष 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक उमेदवार उभे करणार आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजप देशभरात 450 जागांवर उमेदवार उभे करू शकते, अशी चर्चा आहे. यामुळे भाजपला 2019 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये भाजपने एकूण 436 जागांवर उमेदवार उभे केले होते. जिथे त्यांना 303 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या मित्रपक्षांनी उर्वरित 107 जागा लढवून 51 जागा जिंकल्या. पाच वर्षांपूर्वी भाजपला एकूण 22.9 कोटी मते मिळाली होती जी एकूण मतांच्या 37.7 टक्के होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok sabha 2024
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून होणार सर्वेक्षण

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये भाजपने एकूण 436 जागांवर उमेदवार उभे केले होते. यात भाजपला 303 जागांवर विजय प्राप्त झाला होता. भाजपच्या मित्रपक्षांनी उर्वरित 107 जागा लढवून 51 जागा जिंकल्या. पाच वर्षांपूर्वी भाजपला एकूण 22.9 कोटी मते मिळाली होती. जी एकूण मतांच्या 37.7 टक्के होती.  (Latest Marathi News)

यातच काँग्रेसने 2019 मध्ये एकूण 421 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी फक्त 52 जागा त्यांना जिंकता आल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला 11.94 कोटी मते मिळाली. जी एकूण मतांच्या 19.51 टक्के होती. यावेळी काँग्रेस पक्ष देशभरात 290 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसने कमी जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. कारण काँग्रेस 28 पक्षांच्या इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढवणार आहे.

Lok sabha 2024
Aditya Thackeray News: '...म्हणून सूरज चव्हाणांवर कारवाई; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंंत्री शिंदेंवर प्रहार

दरम्यान, 2019 च्या निवडणुकीनंतर बिहारमध्ये जेडीयू, महाराष्ट्रात शिवसेना, तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीतून बाहेर पडले आहेत. अशातच एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांच्या जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करू शकते.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बिहारमधील 40 पैकी 17 जागा, महाराष्ट्रात 48 पैकी 25 आणि तामिळनाडूमध्ये 39 पैकी पाच जागा लढवल्या. पंजाबमध्येही भाजपने 13 पैकी फक्त 3 जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजपला या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने जागांवर निवडणूक लढू शकते. बिहारमध्ये भाजपला आता 'एलजेपी' आणि 'एचएएम'सोबत निवडणूक लढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com