Mira Bhaindar Crime News: १५ लाखांची लाच घेताना हवालदार रंगेहाथ जाळ्यात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरार

Mira Bhaindar Crime News: मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार आणि पोलीस हवालदार गणेश वनवे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
Mira Bhaindar Crime News
Mira Bhaindar Crime NewsSaam Digital
Published On

महेंद्र वानखेडे, मिरा भाईंदर

Mira Bhaindar Crime News

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार आणि पोलीस हवालदार गणेश वनवे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक न करण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरारच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ५० लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रकमेतील १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना गणेश वनवे पोलीस कर्मचाऱ्याला बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मात्र आर्थिक गुन्हे शाखेचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार फरार झाला आहे.

या प्रकरणातील फिर्यादीवर आर्थिक शाखेमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच मदत मिळवून देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार याने ५० लाखांची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ३५ लाखांवर ठरवण्यात आली. यानंतर फिर्यादीने ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mira Bhaindar Crime News
Dhule Crime: बंदुकीचा धाक दाखवून धुळ्यातील व्यापाऱ्यांना लुटले, ३ लाख लंपास; लळींग घाटातील धक्कादायक घटना

या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस आयुक्तालयात सापळा लावला होता. लाचेच्या रकमेतील पंधरा लाखांचा पहिला हप्ता घेताना भाईंदर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश वणवे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार हा फरार झाला आहे. या प्रकरणात मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Mira Bhaindar Crime News
Sangli Crime: सांगली जिल्हा हादरला! प्रेमप्रकरणातून मारहाण, मुलाच्या वडिलांचा मृत्यू; ७ जण अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com