Gorai Beach Killed Case Update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: तरुणी नव्हे तर तरुणाचा मृतदेह, गोराई बिचवरच्या हत्येचं गूढ उकललं, टॅट्यूवरून असा झाला उलगडा

Gorai Beach Killed Case Update: गोराई बिचवर हत्या करून तरुणाच्या मृतदेहाचे ७ तुकडे करून फेकून देण्याता आले होते. या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Priya More

मुंबईतल्या गोराई बीच परिसरामध्ये तीन दिवसांपूर्वी सात तुकडे केलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. हत्या करून शरीराचे तुकडे करून या ठिकाणी फेकण्यात आले होते. या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या हातावर असलेल्या इंग्रजी टॅट्यूवरून या हत्या प्रकरणाचे गूढ उकलून काढत आरोपीला अटक करण्यात आली आहे. भाईंदर येथून आरोपीला अटक करण्यात आली तर इतर दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मोहम्मद सत्तार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रघुनंदन पासवान (२१ वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत दोघेही बिहारमधील दरभंगा येथील कान्होली गावचे रहिवासी असून एकमेकांना ओळखत होते. दुसऱ्या धर्मातील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याने रघुनंदन पासवानची हत्या करण्यात आली. मुलीच्या भावानेच हे कृत्य केले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी रघुनंदनची हत्या करण्यात आली होती. तर १ नोव्हेंबर रोजी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.

गोराई पोलिसांनी सांगितले की, रघुनंदनचे दुसऱ्या धर्मातील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. पण त्या मुलीने रघुनंदनशी संपर्क तोडला. असे असतानाही तो तिला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. वरून वाद झाला आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. रघुनंदन पासवान हा त्याच्या एका मित्रासह मुंबईत आला होता.तो देखील संशयित असून त्याची पोलिस चौकशी करत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय तरुणीचे रघुनंदन पासवानसोबतचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर तिचे कुटुंबीय तिला मुंबईत घेऊन आले होते. पण जेव्हा रघुनंदन तिला भेटायला आला तेव्हा तिचे कुटुंबीय संतापले. यानंतर आरोपी मोहम्मद सत्तारने रघुनंदनला भाईंदर येथे बोलावून घेतले. त्याठिकाणी त्यांच्यत वाद झाला. त्यानंतर मोहम्मदने त्याची हत्या केली आणि नंतर मृतदेहाचे ७ तुकडे केले. आरोपीने रघुनंदनच्या शरीराचे तुकडे एका गोणीमध्ये भरून रिक्षातून नेले आणि गोराई परिसरात फेकून दिले. पोलिसांनी रिक्षाचालकाचीही ओळख पटवली असून रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

रघुनंदन पासवानच्या वडिलांनी त्याच्या उजव्या हातावर असलेल्या आरए टॅटूवरून त्याची ओळख पटवली. रघुनंदन प्रेम करत असलेल्या मुलीचे नाव ए वरून सुरू होत होते. आंतरधर्मीय संबंधांमुळे मुलीच्या नातेवाईकांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी केला आहे. मंगळवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जितेंद्र पासवान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी टॅटूच्या आधारे मुलाच्या मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर मुलीच्या २ भावांपैकी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

रघुनंदन हा पुण्यातील एका खासगी कंपनीत कामाला असून दिवाळीच्या सुट्टीत तो बिहारला आला होता. त्याने शाळा सोडली होती आणि तो गेल्या आठ महिन्यांपासून पुण्यात राहत होता. तिथे तो एका खासगी कंपनीत काम करत होता. रघुनंदनच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, मुलीच्या मोठ्या भावाने रघुनंदनला काही दिवसांपूर्वी धमकी दिली होती. रघुनंदन आणि तरुणी हे दोघेही बिहारमधील एका हॉस्पिटलमध्ये भेटले होते. जिथे पासवानने मुलीला काही औषधे आणण्यास मदत केली आणि तिथून त्यांची मैत्री झाली. मात्र, मुलीच्या घरच्यांना या नात्याची माहिती मिळताच त्यांनी हे नाते संपवण्यासाठी मुलीवर दबाव टाकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT