Mumbai Crime News  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Mumbai : दोन महिलांच्या धमक्या अन् २४ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं, धक्कादायक घटनेने मुंबई हादरली

Bandra East Suicide Case : मुंबईतील वांद्रे पूर्व येथे २४ वर्षीय कायदा पदवीधर तरुणाचा मृत्यू झाला. धमक्यांमुळे तो मानसिक तणावात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून, खेरवाडी पोलिसांनी दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Crime News : मुंबईतील बांद्रा पूर्व परिसरात २४ वर्षीय कायद्याच्या पदवीधर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला तरुणाला पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने तो मानसिक तणावाखाली होता, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. (Bandra East crime news latest update)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण आपल्या आई-वडिल आणि लहान भावासोबत बांद्रा पूर्व परिसरात राहत होता. त्याने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. यापूर्वी तो एका न्यायाधीशांकडे कायदा लिपिक म्हणून काम करत होता. सध्या तो घरून काम करत होता.

बंगळुरू येथे शिक्षण घेत असताना तरुणाचे एका महिलेसोबत संबंध होते. पुढे या संबंधांमध्ये बिघाड झाल्यानंतर संबंधित महिला आणि तिची मोठी बहीण तरुणाला धमकावत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे तो मागील काही दिवसांपासून मोठ्या मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले होते.

६ ऑगस्ट रोजी तरुणाच्या दोन मित्रांनी त्याच्या आईला फोन करून तो तणावात असल्याची माहिती दिली. त्यानंतर आईने मुलाशी याबाबत चर्चा केली असता, संबंधित महिलांकडून आपल्याला धमकावले जात असल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याचदरम्यान आरोपींपैकी एका महिलेने तरुणाच्या लहान भावाच्या मोबाइलवर संदेश पाठवून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याचेही समोर आले.

दरम्यान, आई आपल्या मुलाच्या मित्राशी फोनवर बोलत असताना तरुणाने स्वतःला खोलीत बंद केले. काही वेळाने कुटुंबीयांना तो प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच इमारतीखाली मोठी गर्दी जमल्याची माहिती चालकाने दिली. तरुण गंभीर अवस्थेत आढळल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मृत तरुणाच्या आईने खेरवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन महिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून संबंधित पुरावे आणि जबाब नोंदवले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger water: दररोज सकाळी उपाशी पोटी प्या आल्याचं पाणी; 1 महिन्यात मिळतील 6 चमत्कारिक फायदे

Blood Group: तुमचा ब्लड ग्रुप सांगू शकतो तुम्हाला कोणत्या आजारांचा आहे धोका?

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! ८ व्या वेतन आयोगाने पगारात होणार बंपर वाढ; २.५७ फिटमेंट फॅक्टरने किती वाढेल पगार?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात चार जाहीर सभा

किचनमध्ये चप्पल घालून जेवण बनवणं चुकीचं की बरोबर? वास्तुशास्त्र काय सांगते?

SCROLL FOR NEXT