Mumbai Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai Crime: ब्रेकअपनंतरही बॉयफ्रेंडचा त्रास, रागात तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; मुंबईत प्रेमाचा हादरवणारा शेवट

Mumbai Crime News: मुंबईमध्ये एका तरुणीने बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. घाटकोपरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. पोलिस तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  • घाटकोपरमध्ये २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

  • बॉयफ्रेंड अली शेखच्या त्रासाला कंटाळून संपवलं आयुष्य

  • दोघे एकाच कंपनीत काम करत होते

  • अलीचे दुसऱ्या मुलीशी संबंध असल्याचे तरुणीला समजले

  • सततच्या वादामुळे आणि छळामुळे तरुणीने आत्महत्या केली

मुंबईमध्ये एका २२ वर्षीय तरुणीने बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना मुंबईच्या घाटकोपरमध्ये घडली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी तरुणाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितीका चव्हाण असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. रितीकाचे अली शेखसोबत प्रेमसंबंध होते. अलीकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून रितीकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अली शेखविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, रितीका चव्हाण ही तरुणी आई-वडील आणि भावासोबत घाटकोपरमधील इंदिरानगरमध्ये राहत होती. ६ ऑक्टोबर रोजी रितीकाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. रितीका २०२३ पासून अंधेरी पूर्व येथील ईस्टर्न फार्मामध्ये सेल विभागात काम करत होती. पण सहा महिन्यांपूर्वी तिने अचानक राजीनामा दिला. ती सतत मानसिक तणावात होती असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

रितीकाचे तिचा माजी सहकारी अली शेखसोबत प्रेमसंबंध होते. धर्म वेगळा असल्यामुळे रितीकाच्या कुटुंबीयांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. कुटुंबीयांचा विरोध असताना देखील रितीका अलीवर प्रेम करत राहिली. ५ महिन्यांपूर्वी रितीकाला कळाले की अलीचे त्याच ऑफिसमधील एका तरुणीसोबत देखील प्रेमसंबंध आहेत. हे रितीकाला कळाले तेव्हा तिने त्याला जाब विचारला. तेव्हा अलीने तिला सांगितले की, 'हे माझं आयुष्य आहे. मी काहीही करेन.' त्यानंतर तो तिच्याशी सतत वाद घालत राहिला.

रितीकाकडे बाईक खरेदी करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप अली शेखवर आहे. अलीला पैसे देण्यासाठी रितीकाने सेव्हिंग केलेले पैसे दिले. नवरात्रीपूर्वी रितीकाचा अलीसोबत ब्रेकअप झाला. त्यानंतर तिने नोकरी देखील सोडली. त्यानंतर ती विक्रोळीतील एका कंपनीमध्ये कामाला लागली. त्याठिकाणी येऊन अली शेख तिला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून रितीकाने आत्महत्या केली. या प्रकरणी रितीकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणयात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarara Suits: लग्नसराईसाठी लेहेंगा किंवा ड्रेसपेक्षा ट्राय करा क्लासिक शरारा सूट, दिसाल ग्लॅमरस आणि हटके

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, मराठा समाजाची मागणी

Nashik Municipal Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर, तुरुंगातील ३ महायुतीच्या नेत्यांना दिलासा, पण भवितव्य काय?

Winter Eye Care: धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

अजितदादांचा काकांना दे धक्का! ४० वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या शिलेदारानं सोडली साथ

SCROLL FOR NEXT