Crime News : मुंबई हादरली! गरोदरपणात पोटात लाथा मारल्या, गरम तेलाने भाजलं, सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Navi Mumbai News : नवी मुंबईत मेहक शेख नावाच्या महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. आर्थिक मागण्या, मारहाण आणि मानसिक त्रासामुळे तिने ७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
Crime News : मुंबई हादरली! गरोदरपणात पोटात लाथा मारल्या, गरम तेलाने भाजलं, सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Crime News Saam Tv
Published On
Summary

नवी मुंबईतील मेहक शेखने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली

सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागणी, मारहाण आणि मानसिक छळ होत होता

मेहक पाच महिन्यांची गरोदर असतानाही तिला अत्याचाराला सामोरे जावे लागले

या घटनेनंतर सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

मुंबईतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची मुंबईत पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुटुंबियांच्या छळाला कंटाळून नवी मुंबईतील एका महिलेने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे या महिलेला माहेरच्या कुटुंबियांकडून आर्थिक मागणी करण्याची जबरदस्ती केली जात होती. ही मागणी पूर्ण न झाल्यास महिलेच्या सासरकडील मंडळी तिचा छळ करत होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेत सासू, सासरे, नवरा आणि नणंदेचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नाव मेहक शेख असे आहे. ती तळोजा येथे वास्तव्यास होती. मेहकच लग्न २० सप्टेंबर २०१९ रोजी इम्रान शेख सोबत थाटामाटात पार पडलं. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावर अत्याचार आणि मानसिक छळ केला. धक्कादायक म्हणजे ती पाच महिन्यांची गरोदर असताना तिच्या सासरच्या मंडळींनी तिला गरम तेलाने भाजणे, पोटात लाथ मारणे तसेच अनेक प्रकारे शरीरावर हल्ला केला. सप्टेंबर २०२३ मध्ये इमरानने तिला भिंतीवर ढकलले ज्यामुळे तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले.

Crime News : मुंबई हादरली! गरोदरपणात पोटात लाथा मारल्या, गरम तेलाने भाजलं, सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Heartbreaking : घराजवळ खेळत होते, पाय घसरला अन् कॅनॉलमध्ये पडले, २ चिमुकल्यांचा मृत्यू

वारंवार छळ सहन करूनही, कुटुंबाच्या दबावामुळे मेहक तिच्या पतीशी एक निष्ठ राहिली, असे तिच्या वडिलांनी सांगितले. शिवाय तिच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी, इम्रान आणि त्याच्या बहिणींनी मेहकला आर्थिक मागण्यांवरून त्रास दिला होता. त्यांनी तिच्या पालकांकडून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव आणला आणि जर तिने त्याचे ऐकले नाही तर त्यांच्या मुलीला विकण्याची धमकी दिली.

Crime News : मुंबई हादरली! गरोदरपणात पोटात लाथा मारल्या, गरम तेलाने भाजलं, सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

या जाचाला कंटाळून ७ नोव्हेंबर रोजी मेहकने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने व्हिडिओ बनवून आपल्या कुटुंबियांना पाठवला. या व्हिडिओमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे तिने म्हटले. मेहेकच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . या तक्रारीनुसार पोलिसांनी मेहेकच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com