राज्यात पावसाने रजा घेतली असून हवामान कोरडे झाले आहे
उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे
धुळे येथे हंगामातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले
पुढील आठवडाभर राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
महाराष्ट्रातून पावसाने रजा घेतली असून राज्यावर आता गुलाबी थंडीची चादर पसरली आहे. हवामान कोरडे झाले असून उत्तरेकडील थंड हवा महाराष्ट्राकडे आल्याने राज्याच्या किमान तापमनात घट होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा १४ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. आज मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान तापमनातील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यात सकाळच्या सुमारास धुकं पाहायला मिळत आहे. तसेच वातावरणात गारठा वाढला आहे. मात्र दुपारच्या सुमारास पुन्हा उन्हाचा चटका लागत आहे. कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्याचे हंगामातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, जेऊर, निफाड, नाशिक, महाबळेश्वर, वाशीम आणि अमरावती येथे किमान तापमानाचा पारा १४ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे.
उत्तरेकडून शीत वाऱ्याचे प्रवाह येत असल्याने महाराष्ट्रातील किमान तापमानात घट दिसून आली. जळगावमध्ये सर्वाधिक कमी १०.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. इतर जिल्ह्यांतील तापमानात सरासरी १ ते २ अंशांची घट झाल्याने थंडीचा कडाका जाणवला. मंगळवारपासून कमाल आणि किमान तापमान हळूहळू २ ते ४ अंशांनी घटू शकते असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
येणारा आठवडा राज्यात थंडीची लाट घेऊन येणारा ठरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. उत्तरेकडील थंड वारे मध्य भारत तसेच महाराष्ट्राकडे वाहून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमान अचानक घटून थंडीला सुरुवात झाली.आज राज्याच्या कमाल व किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.