Mumbai Coastal Road Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास सुस्साट; दादर-प्रभादेवीहून नरिमन पॉईंट अवघ्या काही मिनीटांत; कोस्टल रोडचा भुयारी मार्ग सुरु

Mumbai Coastal Road Traffic : कोस्टल रोडचा हा मार्ग मध्य रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील फायदेशीर असणार आहे. तसेच दादर, प्रभादेवी येथून नरिमन पॉईंटला जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Prashant Patil

मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि कामाची बातमी आता समोर आली आहे. मुंबईमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेकोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जे. के. कपूर चौक येथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालं आहे. कोस्टल भुयारी मार्ग आता चारचाकी वाहने आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास आणखी सुस्साट होणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधला गेला आहे. त्यामुळे आता प्रभादेवीतून नरिमन पॉइंट तसेच वांद्रे वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहतूक सोप्पी झाली आहे. भुयारी मार्गात दुचाकी, तीनचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेश असणार नाही.

कोस्टल रोडचा हा मार्ग मध्य रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील फायदेशीर असणार आहे. तसेच दादर, प्रभादेवी येथून नरिमन पॉईंटला जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. कोस्टल रोडच्या या भुयारी मार्गाने प्रवासी दादर, प्रभादेवी येथून थेट नरिमन पॉईंट अवघ्या कमी वेळात गाठू शकणार आहेत. हा मार्ग सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुला असेल. हा भुयारी मार्ग जे. के. कपूर चौक ते कोस्टल रोड, तसेच सागरी सेतूला जोडला गेला आहे. त्यामुळे खान अब्दुल गफ्फार खान मार्गावरुन सी लिंकला जाणारी वाहतूक कोंडी कमी होईल. आता या भुयारी मार्गानं प्रवासी सुस्साट जाणार आहेत. या भुयारी मार्गातून दोन मार्ग निघतात. त्यातील एक मार्ग हा कोस्टल रोडकडे जाणारा तर दुसरा मार्ग हा वरळी सी लिंककडे जाणार आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

कोस्टल रोड हा प्रकल्प सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प होता. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरु होतं. अखेर या रोडचं लोकार्पण झालं होतं. पण तरीही या मार्गाचं भूमिगत मार्ग वाहतुतीसाठी खुले करण्यात आले नव्हते. त्यांचं काम सुरु होतं. आता भूमिगत मार्गही वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालं आहे. हा मार्ग प्रवाशांसाठी खुलादेखील झाला आहे. या मार्गामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT