Mumbai Central Railway Local Train Sunday Mega Block Saam tv
मुंबई/पुणे

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Mumbai Central Railway Local Train Sunday Mega Block : मध्य रेल्वेने रविवारी ठाणे–कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. हार्बर व ट्रान्स-हार्बर मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द राहणार असून एक्स्प्रेस गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

Alisha Khedekar

  • रविवारी २१ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक जाहीर

  • ठाणे–कल्याण दरम्यान ५वी व ६वी मार्गिका बंद

  • हार्बर व ट्रान्स-हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रद्द

  • काही मेल व एक्सप्रेस गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार

तुम्हीसुद्धा रविवारी सुट्टीच्या दिवशी फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि लोकलने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी कामांमुळे रविवार दि. २१ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान असून मेल गाड्या दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येतील. तर हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार रविवारी २१ डिसेंबर रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे. हा ब्लॉक ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ वी आणि ६वी मार्गिकेवर ०९.०० ते १३.०० वाजेपर्यंत असणार आहे. यादरम्यान अप मेल / एक्सप्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या गंतव्य स्थानकावर सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. तसेच डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यासुद्धा नियोजित स्थानकांत सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहचतील.

हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५ वाजेपर्यंत असणार आहे. पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील १०.३३ ते १५.४९ वाजेदरम्यान सुटणाऱ्या गाड्या, तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील ०९.४५ ते १५.१२ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील ११.०२ ते १५.५३ वाजेदरम्यान सुटणाऱ्या गाड्या, तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील १०.०१ ते १५.२० वाजेदरम्यान सुटणाऱ्या गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील. तर या ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील.

'या' एक्सप्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील

* 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

* 17611नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस

* 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

* 13201 राजगीर – लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस

* 17221 काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

* 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

* 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस

* 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

* 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

* 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

* 12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल

* 12812 हाटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

* 11014 कोयंबतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

'या' डाउन एक्सप्रेस गाड्या ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील

* 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर एक्सप्रेस

* 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोंडा गोदान एक्सप्रेस

* 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पवन एक्सप्रेस

* 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस

MEMU गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन

61003 वसई रोड – दिवा मेमू ०९.५० वाजता वसई रोड येथून सुटणारी मेमू गाडी कोपर येथे १०.३१ वाजता शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. तर 61004 दिवा – वसई रोड मेमू ही मेमू गाडी दिवा ऐवजी कोपर येथून ११.४५ वाजता शॉर्ट ओरिजिनेट होऊन वसई रोड येथे १२.३० वाजता पोहोचेल. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी व सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली असून सहकार्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

SCROLL FOR NEXT