Bhiwandi Shastrinagar Youth brutally beaten  Saam Tv News
मुंबई/पुणे

Crime News : मैत्री तुटली, बर्थडेला दिलेलं गिफ्ट घ्यायला मुलीच्या घरी, मैत्रिणीसह अख्ख्या सोसायटीनं मुलाला चोपलं

Crime News : 'मैत्रिणीच्या वाढदिवसाला घड्याळ गिफ्ट केलं होतं. परंतु काही दिवसांनी त्यांचं बोलणं चालणं बंद झाल्याने त्याने घड्याळ परत मागितली होती आणि ती देण्यासाठी मैत्रिणीने त्याला मेसेज करून बोलावलं होतं.'

Prashant Patil

ठाणे (भिवंडी) : भिवंडीत चोरी केल्याच्या संशयातून दोन १६ वर्षीय अल्पवयीन मुलांना जमावाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील शास्त्रीनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी जमावाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजान आकिब कुरेशी, आबिद कुरेशी, दानिश कुरेशी, पापा कुरेशी, नेहा कुरेशी,आशिया कुरेशी, रेश्मा कुरेशी, गुमची कुरेशी, नदीम, इम्तियाज, अफान आणि त्यांचे इतर चार साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या जमावाची नावे आहेत. तर दानिश सिकंदर मोमीन आणि त्याचा मित्र जुनैद नुरुलहसन सिध्दीकी अशी जखमींची नावे आहेत.

जखमी दानिश मोमीन याने सांगितलं की, 'मैत्रिणीच्या वाढदिवसाला घड्याळ गिफ्ट केलं होतं. परंतु काही दिवसांनी त्यांचं बोलणं चालणं बंद झाल्याने त्याने घड्याळ परत मागितली होती आणि ती देण्यासाठी मैत्रिणीने त्याला मेसेज करून बोलावलं होतं. त्यामुळे दानिश आणि त्याचा मित्र मैत्रिणीच्या घराकडे गेले असता त्यांना तिथे चोरीचा संशयावरून जबर मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर दानिशला नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांचा हस्तक्षेपामुळे दानिशला जमावाच्या मारहाणीतून सुरक्षित काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगमा सिकंदर मोमीन ही महिला मंगल बाजारातील जैतुनपुरा परिसरात राहत असून तिचा मुलगा दानिश आणि त्याचा मित्र जुनैद हे दोघे २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शास्त्रीनगरमधील पाचू कंपाऊंडमधील बुशरा अपार्टमेंट येथे गेले असता वरील जमावाने संगनमताने दोघांनाही चोरीच्या संशयावरून लाथा बुक्क्यांसह काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमं केलं आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सर्वांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास भिवंडी शहर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT