अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; ३५० वर्षांची परंपरा अबाधित, काय आहे परंपरेचं वैशिष्ट्य?

Buldhana Bhedwal Ghat Mandani Prediction : बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवलं येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेला तालुक्यातील भेंडवड येथे घटमांडणी करण्यात येणार आहे.
Buldhana Bhedwal Ghat Mandani Prediction
Buldhana Bhedwal Ghat Mandani PredictionSaam Tv News
Published On

बुलढाणा : बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवलं येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेला तालुक्यातील भेंडवड येथे घटमांडणी करण्यात येणार आहे. कृषी विषयक पिके व पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, राजकीय इत्यादी गोष्टींचा वार्षिक अंदाज व्यक्त करणारी येथील वाघ परिवाराने जपलेली साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली अक्षय तृतीयेची घट मांडणी उद्या ३० एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात येणार आहे. १ मे रोजी सूर्योदयापूर्वी येणाऱ्या वर्षातील भाकीत वर्तवण्यात येणार आहे.

या मांडणीचं भाकित आजपर्यंत बहुतांशी खरं ठरत असल्यानं शेतकऱ्यांचा व शेतीशी निगडित असणाऱ्या व्यावसायिकांच्या दृष्टीने हा वार्षिक अंदाज जसा उत्कंठेचा विषय असतो त्याचप्रमाणे राजकीय भाकीत देखील ऐकण्यासाठी राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करत असतात. भेंडवळ येथील वाघ कुळातील चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केलेली या मांडणीची परंपरा आज साडेतीनशे वर्षानंतरही त्यांच्या वंशजांनी जिवंत ठेवली असून दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या बदलत्या वातावरणाचा फटका कोणाला कसा बसतो या भाकिताद्वारे समजणार असल्याने याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे.

Buldhana Bhedwal Ghat Mandani Prediction
Maharashtra Cabinet Decision : राज्यात सुधारित पीक विमा लागू करणार, टोल नाक्यावर सूट; राज्य मंत्रिमंडळाचे 'एक से एक' धडाकेबाज निर्णय

भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण १८ प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.

Buldhana Bhedwal Ghat Mandani Prediction
Rohit Pawar: पवार कुटुंब एकत्र येऊ नये ही 'त्या' एकाची इच्छा! पडद्यामागं कोण करतंय काम? रोहित पवार थेट नाव फोडणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com